५० हजारांचे कर्ज घेऊन चार भावांनी उभा केली करोडो रुपयांची HERO सायकल कंपनी..

मित्रहो बालपण हे आपल्या आयुष्यातील सोन्याचे दिवस असतात, या दिवसात आपल्या हातून खुप काही घडत असते आणि त्याला निरागस पणाची जोड मिळून ती कृती आणखीनच फुलते. आजकालच्या मुलांचे बालपण काही खास वाटत नाही, त्यांच्या हातातील स्मार्ट फोनने त्यांच्या बालपणातील रस घालवून टाकला आहे, पण मित्रहो एक काळ असाही होता जेव्हा खेळण्यासाठी फक्त मित्र आणि एखादी जागा मिळाली तरी खूप काही मिळाल्यासारखे होते, डाव कसा आणि कधी रंगला हे त्यांनाही कळायचं नाही.

आताची मुले जरा मोठी होत नाहीत तोवर त्यांना बाईक हवी असते, पण पूर्वी मुलांना सायकल भेट केली जायची. ही सायकल म्हणजे त्यांच्यासाठी अनमोल वस्तू होती, त्यामुळे तिचं आपणाला मिळणं म्हणजे भाग्यच. मित्रहो ही सायकल खूप उपयोगाची असते, तिचा एक निराळाच इतिहास दडला आहे. आज आपण याच हिरो सायकलचा इतिहास जाणून घेणार आहोत, याची सुरुवात होते ब्रिजमोहनलाल मुंजाल आणि त्यांच्या तीन भावंडांपासून. दयानंद, सत्यानंद, ओमप्रकाश.

हे चौघे पंजाब मधील टोबाटेक सिंह जिल्हा (पाकिस्तान मध्ये आहे सध्या) येथील कमलिया मध्ये राहत होते. वाटणी व्हायच्या आधीच हे चौघेही अमृतसर मध्ये आले होते आणि सायकलचे पार्ट बनवत होते. त्यांचा हा व्यवसाय सुरळीत चालू असताना ब्रिजमोहन यांनी एकदा आपल्या भावांसमोर सायकल पूर्ण बनवण्याचा प्रस्ताव मांडला, थोडीफार तक्रार करत ते तिघेही तयार झाले आणि त्यांनी लुधियाना मध्ये काम सुरू करण्याचा निर्णय घेतला. व हे बंधू आपले समान बांधून लुधियानाला निघाले. हा प्रवास त्यांच्यासाठी किती खडतर होता हे आपण सहज समजू शकत नाही.

ते चालले असताना दरम्यान एक मुस्लिम व्यक्ती जी पाकिस्तान मध्ये निघाली होती, त्याचे करीम दीन असे नाव होते. त्याने सायकल स्टॅण्ड बनवण्याचा व्यवसाय सुरु केला होता, आणि स्वतःचा एक ब्रँड तयार केला होता. तेव्हाच करीम आपला मित्र ओमप्रकाश यांना अखेरचे भेटण्यास जातो, तेव्हा ओमप्रकाश यांनी करीमचे ब्रँड नाव वापरण्याची परवानगी घेतली आणि करीम देखील होकार दिला. हा ब्रँड दुसरा तिसरा नसून “हिरो” हाच होता. वाटणी झाल्यावर आता पुन्हा लुधियाना मध्ये नव्याने सुरुवात करणे खरच अवघड होते.

सुरुवातीला या भावंडांनी लुधियाना मध्ये पत्रे वाटायला सुरुवात केली, हा काळ १०५६ मधील होता. जेव्हा या चार भावांनी ५० हजारचे कर्ज घेतले आणि सायकल पार्ट बनवण्याची आपली पहिली युनिट लुधियाना मध्ये स्थापन केली. येत्या काळातील दहा वर्षातच त्यांनी भरपूर यश मिळवले. इतकेच नव्हे १९६६ पर्यंत पोहचता कंपनी एका वर्षात एक लाख सायकल तयार करू लागली होती. त्यानंतर त्यांची मेहनत आणखीन वाढली, आणि याचेच प्रतीक म्हणजे १९८६ मध्ये त्यांच्या “हिरो सायकल” कंपनीचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये रेकॉर्ड करण्यात आले.

या “हिरो सायकल” ला इतके प्रसिद्ध करण्यामध्ये मुंजाल भावंडांची खूप मोठी साथ आहे तसेच डीलर्स, वर्कर्स, ग्राहक यांना देखील ते पुढे घेऊन गेले. तसेच या बाबतीत आणखीन एक किस्सा असा आहे की जेव्हा १९८० मध्ये सायकल भरलेला ट्रक लोडेड होऊन अपघात झाला तेव्हा आपल्या नुकसानीची विचारपूस करण्याआधी मुंजाल साहेबांनी ट्रक चालक बरा आहे ना ? असे विचारले होते, शिवाय मॅनेजरला त्यांनी ऑर्डर दिली की त्या ट्रकला फ्रेश कंसाईनमेंट मध्ये पाठवावे कारण यामध्ये चालकाची काहीच चुकी नाही. या घटनेवरून त्या चार भावंडांच्या साफ मनाची देखील इथे पारख झाली होती.

जेव्हा हिरोने जपान मधील प्रसिद्ध वाहन निर्मिती कंपनीशी आपले नाव जोडले, “honda” सोबत आपले नाव जोडून त्यांनी “Hero Honda motors ltd” ची स्थापना केली. १३ एप्रिल १९८५ मध्ये पहिली बाईक CD १०० ला लॉन्च करण्यात आली. या दोन्ही कंपनींनी जवळपास २७ वर्षे एकत्र कांम केले होते. मात्र पुढे २०११ मध्ये या वेगळ्या झाल्या. पण या हिरो सायकल चा प्रवास मात्र खरच खूप कठीण होता. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.