आईच्या ११ वर्ष जुन्या साडीपासून शिवला एक हटके कुर्ता, या अभिनेत्याची सर्वत्र चर्चा…

मित्रहो आठवण जपायला आली की माणुसकी आणि माणूस आपोआप जपला जातो. खास करून आपल्या जवळच्या व्यक्तीच्या आठवणी जपाव्या तितक्या कमी असतात, आपण त्या नेहमी आपल्या उराशी बाळगून ठेवतो. हल्ली असाच एक अभिनेता आपल्या आईची आठवण जपत सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. त्याने केलेल्या कामाचे सर्वत्र चांगलेच कौतुक होत आहे. मित्रहो हा अभिनेता आहे “महाराष्ट्राची हास्यजत्रा” या मराठी शोमधील पृथ्वीक प्रताप.

पृथ्वीक सध्या सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याने आपल्या आईच्या आठवणींची ऊब उराशी बाळगत तिच्या ११ वर्षे जुन्या साडीपासून एक सुंदर असा कुर्ता शिवून घेतला आहे. हा कुर्ता घालून त्याने काही फोटो सुद्धा सोशल मीडियावर शेअर केले आहेत, त्याच्या या फोटोना नेटकऱ्यांनी भरभरून प्रेम दिले आहे. शिवाय यावर अनेकांनी छान छान कमेन्ट सुद्धा केल्या आहेत. या कमेंट सुद्धा खूप गोड असून, त्याची पोस्ट खूप लोकप्रिय होत आहे.

तो फोटो शेअर करत म्हणतो की “११ वर्षांपासून माझ्या आईने बॉटल ग्रीन रंगाची एक सुंदर साडी जपून ठेवली होती. मी त्या साडीचा एक सुपर क्लासिक कुर्ता व एक कोटी शिवून घेतली. आईची साडी आता तिचा मुलगा जपणार आहे” असे लिहून त्याने सर्वानाच भावनिक केले आहे. तसेच अलीकडेच पृथ्वीकने अभिनेता रौनक शिंदे याच्या लग्नात हजेरी लावली होती, त्यावेळी त्याने आपल्या आईच्या साडीपासून शिवलेला कुर्ता आणि कोटी परिधान केले होते. ज्यामध्ये तो खूपच निरागस, आणि लक्षवेधी दिसत होता.

View this post on Instagram

A post shared by PRITHVIK PRATAP (@kahani_puri_filmy_hai)

त्याच्या फोटोना पाहून चाहत्यांनी खूप छान कमेंट दिल्या आहेत. “तू आमचा लाडका होतोय…पण आज माणूस म्हणून तू जे करून दाखवलं आहे त्याला मानाचा मुजरा…. बाकी कुर्ता एक नंबर दिसतोय आणि त्यात तू आणखी शोभून दिसतोय” अशी सुंदर कमेन्ट एका चाहत्याने केली आहे. तसेच अनेकांनी या फोटोना भरभरून प्रतिसाद दिला आहे. निरनिराळ्या कमेन्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

पृथ्वीक हा आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतो, तो नेहमी काही ना काही शेअर करत असतो. त्यामुळे चाहते नेहमीच त्याच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत असतात. मात्र त्याच्या या कुर्ता मधील फोटोंच्या पोस्टला अनेकजण भावुक होऊन कमेन्ट करत होते, कारण त्याने खूपशा आठवणी ताज्या केल्या आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर त्याचे आणि त्याच्या कुर्त्याचे प्रचंड कौतुक होत आहे.