लग्नात नवरदेव करत आहे भन्नाट डान्स, व्हिडिओ पाहून तुम्ही पोट धरून हसाल..

नुकताच आपल्या इथला लग्नाचा हंगाम संपला आहे. सध्या कोरोनामुळे (Corona Pandemic) लग्नामध्ये पहिल्या इतकी मजा करणं शक्य होत नाही. कारण सरकारकडून खूप निर्बंध आणले  गेले आहेत. पण लग्न म्हणजे खूप मजा मजा असते. तो समारंभ करणं म्हणजे अक्षरशः खूप तयारी आधीपासून तर होतेच. पण ते पार पाडतानाही बऱ्याच खटपट करावी लागते. लग्नात विधी मग मुख्य मुहूर्त, जेवण, रीती- भाती, पाहुणे – रावळे, गप्पा- टप्पा, आकर्षण असतं, त्याच बरोबरीने दुसरं आकर्षण असतं ते म्हणजे लग्नाची वरात….(Barat)

लग्नात मुलाकडचे मोठ्या तोऱ्यात फिरत असतात. मान- पान यासाठी अडून बसतात. मुलीकडचे या नव्या पाहुण्यांची बडदास्त ठेवण्यात मग्न असतात. ज्यांची लग्न व्हायची आहेत असे किंवा त्यांचे जवळचे त्यांचं कुठं जुळतंय का हे बघत असतात. पण या सगळ्या नाना तऱ्हा सोडून मुलाकडचे- मुलीकडचे व बाकी मंडळी हे सगळे एकत्र येतात ते वरातीत नाचायला. हल्ली लग्नाच्या आधी मेहंदीचा कार्यक्रम झाल्यावर ‘संगीत’ (Sangeet) हा उत्तर भारतीय पद्धतीप्रमाणे एक खास वेगळा कार्यक्रम ठेवला जातो.

पण तो एन्जॉय करूनही वरातीची वेगळी मजा सगळ्यांना हवी असते. विसर्जन मिरवणुकीत जसं वातावरण असतं असंच वरातीला असतं…. छान सनई – चौघडे अक्षता टाकताना हवेत पण वरातीला ढोल – नगारे जोरदार वाजले पाहिजेत, त्याचबरोबर डीजेचा दणका पाहिजे. आणि दणकून नाच झाला पाहिजे, यासाठी प्रत्येकजण स्वतःमधला पट्टीचा डान्सर जागा करतो आणि सुरू होतो. या प्रसंगावरून विनोदही वाचला असेल की नवराच जाऊन डीजेला सांगतो की बाबा आधी लाव चांगली गाणी नंतर पोरं जनरेटरच्या आवाजावर सुद्धा नाचतील.

दोन्ही बाजूचे पाहुणे मंडळी, त्यांच्यासोबत बँडचा आवाज ऐकून पळत येणारी पोरंसोरं हे सगळे ब्रेकडान्स, हिपहॉप, बॉलीवूड स्टाईल (Break Dance, Hiphop, Bollywood Style) यातलं त्यांना जे जसं जमतंय तसं ते दाखवत असतात. त्याच जोडीला नागीन, बाल्या, पतंग, बच्ची डान्स असले स्थानिक पातळीवर वर्ल्ड फेमस डान्सप्रकारही असतात. पण याहून कुणाची कला बहराला आलीच तर तो जगाला अनोख्या प्रकारचा डान्सफॉर्म देऊन जातो. त्या प्रसंगाचं ती व्यक्तीच खास आकर्षण ठरते. आणि नवरा वगैरे राहतो बाजूला. पण आपण ज्या व्हिडिओ बद्दल बोलत आहोत त्या मध्ये जो समारंभाचं मुख्य आकर्षण तर आहेच, आणि वरातीचंही आहे म्हणजे कोण तर साक्षात नवरदेव.

बाकी बऱ्याच लग्नात नाचलेल्याला स्वतःच्या लग्नात ती संधी शक्यतो मिळत नाही. आणि क्वचित मिळालीच तर नवरामुलगा त्याच्या मित्रमंडळीचं समाधान व्हावं म्हणून थोडा वेळ आपले हात वर करतो. पण हा नवरदेव आपल्याच नादात जो काही सुरू झाला आहे ना ते पाहून तुम्ही हसायचं थांबणार नाही.

व्हिडिओ मध्ये महिलांचा घोळका नाचतो आहे. हा नवरा एका बाजूला केवळ कंबर हलवून नाचतो आहे. इथूनच सुरुवात होते, नंतर हा सगळ्या महिलांना बाजूला सरकायला सांगतो आहे. आणि केंद्रबिंदू पाशी येऊन तिथून एखादा मासा कसा शेपटी हलवत पुढं जाईल तसा काहीसा हा डान्स करत पुढे जातो. बाप रे बाप हा नृत्याविष्कार पाहून आपल्याला इतकं हसू येईल. ज्या आत्मविश्वासाने या भावाने हा नृत्यप्रकार (Funny Dance Of  सादर केला आहे, त्यासाठी त्याचं कौतुक आहे. माणसानं आपलं सिलेब्रेशन (Celebration) करण्यासाठी आपल्या अनोख्या पद्धती शोधाव्यात, कुणाचाही विचार करू नये.
फारच विचारांचं काहूर माजलं असेल, ताण वाढला असेल तर हा व्हिडिओ पहायचा, आणि मनसोक्त हसायचं… वर आपणच मोबाईल वर गाणं लावायचं आणि व्हायचं झिंग झिंग झिंगाट!.!.!