‘गाढवाचं लग्न’ चित्रपटातील गंगी आठवते का? आता इतक्या वर्षानंतर दिसते अशी..पहा तिचा मॉडर्न लुक..

मराठी चित्रपट सृष्टीतील चित्रपट मराठी माणसांच्या मनावर सर्वाधिक परिणाम करतात. कारण, मराठी ही आपली मातृभाषा असल्याने हिंदी चित्रपट पाहण्यापेक्षा प्रेक्षकांचा मराठी चित्रपट पाहण्याकडे जास्त कल असतो. मराठी चित्रपट सृष्टीतील ‘गाढवाचं लग्न’ हा चित्रपट प्रचंड गाजलेला आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे.

‘गाढवाचं लग्न’ या चित्रपटातील कलाकारांनी उत्तम अभिनयाने व कॉमेडीने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. या चित्रपटाचे नाव जरी घेतल तरी, आजही मकरंद अनासपुरे आणि इतर कलाकारांची विनोदी जुगलबंदी आपल्याला आठवते. या चित्रपटाने मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अनेक वर्ष अधिराज्य गाजवलं आहे. हा चित्रपट रिलीज होऊन आता तब्बल १४ वर्ष झाली आहे. तरी देखील आजही हा चित्रपट टीव्हीवर लागला की, प्रेक्षक आनंदाने आवरजून बघतात.

गाढवाचं लग्न या चित्रपटातील कितीतरी डायलॉग चाहत्यांच्या अगदी तोंडपाठ आहेत. मात्र, या चित्रपटातील खासकरून गंगी हे पात्र प्रचंड लोकप्रिय ठरले आहे. तिच्या बोलीभाषेपासून ते तिच्या प्रत्येक डायलॉगने प्रेक्षकांच्या मनावर अगदी भूरळच घातली आहे. गंगीच्या ओव्या आणि मकरंद अनासपुरे आजही या दोघांचे डायलॉग प्रेक्षकांनी ऐकले तर, अनेकांना पोटधरून हसू आवरत नाही.

गाढवाचं लग्न या चित्रपटात गंगीची भूमिका ‘राजश्री लांडगे’ या अभिनेत्रीने साकारली होती. “हे तर असं झालं की, रोज घालतय शिव्या आणि एकादशीला गातंय ओव्या” या चित्रपटातील तिची ही ओवी प्रचंड गाजली आहे. तसेच अशा अनेक म्हणींनी गंगीने चित्रपटात धमाल उडवून दिली होती. राजश्रीने तिचे चित्रपट सृष्टीतील पदार्पण गाढवाचं लग्न या चित्रपटामध्ये गंगी या भूमिकेद्वारे केले होते. पहिल्याच चित्रपटातील भूमिकेने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान तिने निर्माण केल आहे.

राजश्रीच्या पहिल्याच चित्रपटात केलेल्या या भूमिकेसाठी तिला महाराष्ट्र राज्य पुरस्कार देखील मिळाला होता. गाढवाचं लग्न चित्रपटामधील गंगीला आजही लोक विसरलेले नाहीत. राजश्रीला तिच्या करिअरच्या पहिल्याच चित्रपटात दिग्गज अभिनेता मकरंद अनासपुरेसोबत प्रमुख भूमिकेत काम करता आले आहे. राजश्रीने या संधीचे सोनं करत तिच्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केले. गाढवाचं लग्न या चित्रपटामध्ये तिला यश मिळाले. मात्र, तिचे हे यश आयुष्यभर टिकू शकले नाही. कारण, गंगी पुन्हा जास्त चित्रपटात दिसली नाही.

राजश्रीची गाढवाचं लग्न चित्रपटातील भूमिका ही सर्वसामान्य म्हणजेच गावरान शैलीची होती. मात्र, आता ही गावरान गंगी आता खूपच ग्लॅमरस झाली आहे. राजश्रीने तिच्या हटके आणि ग्लॅमरस अंदाजातील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहून ती गंगीच आहे हे ओळखणे देखील कठीण झाले आहे. राजश्रीने इंस्टाग्रामवर शेअर केलेले बोल्ड आणि हॉट फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

राजश्रीने चित्रपटात जरी गावरान भूमिका केली असली तरी, तिला खऱ्या आयुष्यात मात्र मॉडर्न राहायला प्रचंड आवडते. गंगीचा हा मॉडर्न अंदाजाने अनेकांच्या मनावर भुरळ घातली आहे. मात्र, तरी देखील अनेक चाहत्यांना गंगीचा गावरान लूकच जास्त आवडेल यात काही शंकाच नाही. तिच्या या नवीन लूकवर अनेक मिम देखील वायरल होत आहेत.

चित्रपटसृष्टीपासून दूर राहिलेल्या गंगीने म्हणजेच राजश्रीने सिटीझन या सिनेमाद्वारे निर्माता म्हणून पदार्पण करत सिनेमाची कथा आणि वेशभूषा देखील पाहीली होती. तिच्या कारकिर्दीची आणि सामाजिक कार्याची दखल घेत तिला ‘भारत गौरव पुरस्कार’ देऊन तिला गौरवण्यात आले होते. गंगीने सिटीझन चित्रपटात प्रमुख भूमिका देखील साकारली होती. ती या चित्रपटात ग्लॅमरस भूमिकेत दिसली होती.

दरम्यान, राजश्री लांडगेच जन्म पुण्यात झाला असून, कुठलाही अभिनयाचा वारसा तिच्या कुटुंबात नव्हता. मात्र, तिला लहांपणीपासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती. ती अभिनयाचे स्वप्न घेऊन मुंबईत आली. मुंबईत तिने काही नाटकांमध्ये देखील काम केले. गाढवाचं लग्न मधील गंगीच्या भूमिकेने तिला वेगळी ओळख मिळाली. मात्र, आता तिचा मॉडर्न अंदाज पाहून तिला ओळखन देखील कठीण झालं आहे.