‘टाइम प्लीज’ मधली ही बालकलाकार आता आहे हि प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री..जाणून थक्क व्हाल

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असत’ या मालिकेने अतिशय अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेतील सर्वच पात्र एकापेक्षा एक वरचड भूमिका बजावतात. मात्र, सालस, बोळी वाटणारी गौरी सर्व प्रेक्षकांची लाडकी आहे. गौरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री गिरिजा प्रभूने बालकलाकार म्हणून अभिनयाला सुरुवात केली आहे.

अभिनेत्री गिरिजा प्रभू हिने ‘टाईमप्लीज’ या चित्रपटामध्ये बालकलाकार म्हणून भूमिका साकारली होती. या चित्रपटात उमेश कामत, प्रिया बापट, सिद्धार्थ जाधव आणि सई ताम्हणकर हे मुख्य भूमिकेत होते. गिरिजा प्रभूने या चित्रपटात एका लहान मुलीची भूमिका साकारली होती.

गिरीजा प्रभू ही अभिनेत्री असून, उत्तम डान्सर देखील आहे. याव्यतिरिक्त, ती कौल मनाचा, काय झालं कळंना, सेंट मेरी मराठी मिडीयम डॅड चिअर्स, तुझा दुरावा या चित्रपटामध्ये देखील तिने अनेक भूमिका साकारल्या आहेत.

अभिनेत्री गिरिजा प्रभू सध्या स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असत’ या मालिकेमध्ये गौरी या पात्राची भूमिका साकारत आहे. तिच्या या सालस आणि भोळ्या स्वभावाने तिने अनेक रसिक प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे.

दरम्यान, ‘सुख म्हणजे नक्की काय असत’ या मालिकेला प्रेक्षक देखील मोठ्या प्रमाणात प्रेम व प्रतिसाद देतात. तसेच या मालिकेतील सर्व पात्र कमालीची भूमिका बजावतात. या मालिकेत नेहमीच वेगवेगळे ट्विस्ट येत असतात. त्यामुळे मालिका अधिक रंजक होवून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते.