बॉलिवूडची ‘ही’ विनोदी अभिनेत्री आता काय करते? पार केली आहे वयाची साठी..झाली आहे आता अशी अवस्था

८०-९० च्या दशकांत केवळ विनोदासाठी म्हणून काही अभिनेते आणि अभिनेत्रींना चित्रपटांमध्ये कामे दिली जायची. गुड्डी मारुती या त्यापैकीच एक. त्यांच्या विनोदामुळे वेगळाच हशा पिकायचा. बरेचसे विनोद हे त्यांच्या वजनावर असायचे. त्या या विनोदांना खूप छान रंग चढवायच्या. त्यामुळे असे आंगिक विनोद बेढब किंवा मर्यादेबाहेरचे वाटायचे नाहीत.

गुड्डी मारुती यांचा जन्म ४ एप्रिल १९६१ रोजी झाला. गुड्डी यांचे खरे नाव ताहिरा परब होते. त्यांचे वडील मारुतीराव परब अभिनेते आणि निर्माते होते. ‘गुड्डी’ हे त्यांचे लहानपणीचे टोपणनाव होते. त्यामुळे तेच नाव घेत मनमोहन देसाई यांनी त्यांचे नामकरण ‘गुड्डी मारुती’ असे करून टाकले. गुड्डी लहानपणापासूनच तब्येतीने जाड होत्या. शाळेत त्यांना कुणी ‘मोटी’ म्हणून चिडवलं तर त्यांना खूप राग येई. प्रसंगी त्यांची भां’ड’णंही होत. मात्र वडील गेल्यानंतर त्यांना काम करणं भाग होतं आणि त्यांचं जाड असणं हीच त्यांची रोजीरोटी बनली होती. त्यामुळे त्यांनी वजन कमी करण्याचा प्रयत्न केला नाही.

वयाच्या १० व्या वर्षीच त्यांनी ‘जान हाजिर है’ चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते. त्यांच्या जाडीमुळे त्यांना अनेक चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका मिळत गेल्या. त्यांनी आजपर्यंत जवळपास ९७ पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. खिलाडी, शोला और शबनम, आशिक आवारा, दुल्हेराजा, बीवी नं. १, बलवान, वक्त हमारा है, छोटे सरकार, मेरी मर्जी, जिंदगी तुमसे, कामयाब अशा अनेक चित्रपटांमध्ये आपल्या विनोदाने त्यांनी रंगत आणली.

गुपचूप गुपचूप (१९८३) आणि आधार (२००२) यांसारख्या मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले आहे. बऱ्याचशा मालिकांमध्येही त्यांनी काम केले आहे. ‘डोली अरमानों की’ (२०१३) मालिकेतील त्यांची बुवाची भूमिका खूप गाजली होती. १९९५ मध्ये त्यांनी अभिनेता व्रजेश हीरजी बरोबर ‘सॉरी मेरी लॉरी’ नावाचा स्टॅन्डअप कॉमेडी शो केला होता.

गुड्डी यांच्या आईचे नाव कमल होते. गुड्डी यांना दोन भावंडे असून ती प्रसिद्धीपासून लांब असतात. अशोक नावाच्या बिझनेसमॅन बरोबर त्यांनी प्रेमविवाह केला. त्यांच्या जाड असण्यामुळे त्यांना मूल जन्माला घालता आले नाही. २००६ मध्ये त्यांनी आपल्या कुटुंबासाठी आपल्या करिअर मधून ब्रेक घेतला. २०१५ मध्ये त्यांनी ‘हम सब उल्लू है’ चित्रपटाद्वारे कमबॅक केलं. गुड्डी यांनी आता वयाची साठी ओलांडली असून चित्रपट किंवा मालिकांमध्ये काम करणं त्यांनी आता जवळपास बंद केलं आहे.