मृ’त्यू’नंतर सलमानची संपत्ती मिळणार ‘यांना’! सलमान खानचे मोठे पाऊल…

बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये ‘२०० करोड क्लब’ सुरू करणारा अभिनेता म्हणून सलमान खानला ओळखले जाते. त्याचे चित्रपट हे बॉक्स ऑफिस वर कायम २०० करोड पेक्षा जास्त गल्ला जमवताना दिसतात. सलमान खानचे किक (२०१४), बजरंगी भाईजान (२०१५), प्रेम रतन धन पायो (२०१५), सुलतान (२०१७), टायगर जिंदा है (२०१८) असे काही चित्रपट आहेत ज्यांनी दणदणीत २०० करोडचा आकडा पार केला. या चित्रपटांनी सलमान खानला प्रसिद्धी बरोबरच बराच पैसादेखील मिळवून दिला.

सलमान स्वतः एक निर्माता देखील असल्याने त्याच्या ‘सलमान खान फिल्म्स’ या निर्मिती संस्थेअंतर्गत चिल्लर पार्टी (२०११), बजरंगी भाईजान (२०१५), रेस ३ (२०१८), दबंग ३ (२०१९), कागज (२०२१), राधे (२०२१) अशा अनेक चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. सलमान खानची आपल्या निर्मिती संस्थेतूनदेखील बरीच कमाई होताना दिसते. त्याचबरोबर जाहिरातींमधूनही सलमान बक्कळ कमवत असतो.

मात्र अनेकांना हा प्रश्न पडलेला असतो, की सलमान खानचे अजून लग्न झालेले नाही, तर मग त्याच्या एवढ्या सगळ्या संपत्तीचा वारस कोण होणार? मंडळी, तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल ना? सलमानने मागे एका मुलाखतीत या प्रश्नाचे उत्तर दिले होते. अनेक मुलाखतींमध्ये सलमानला त्याच्या लग्नाबद्दल विचारले जाते. तसेच त्याच्या नंतर त्याची एवढी सगळी संपत्ती कोणाला मिळणार, असा प्रश्नही विचारला जातो.

आपल्या एका मुलाखतीत सलमान खानने या प्रश्नाचे उत्तर दिले होते. त्याने सांगितले, की त्याचे लग्न होऊ दे अथवा नको होऊ दे, त्याच्या संपत्तीतला अर्धा हिस्सा त्याच्या ‘बीइंग ह्युमन फाऊंडेशन’ या ट्रस्टला जाणार आहे. त्याचे लग्न झाले, तर त्याची अर्धी संपत्ती ही या ट्रस्टच्या नावे असेल. जर सलमानचे लग्न झाले नाही, तर त्याच्या पश्चात त्याची सगळी संपत्ती या ट्रस्टच्या नावे होणार असल्याचेही त्याने या मुलाखतीत स्पष्ट केले होते.

सध्या त्याचा हा जुना व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसत आहे. सलमानच्या या निर्णयाने त्याच्या चाहत्यांना खूपच आनंद झाल्याचे दिसून आले. सलमानचा चाहतावर्ग बराच मोठा आहे. हा चाहतावर्ग बऱ्याच वेळा त्याच्या ‘बीइंग ह्युमन फाऊंडेशन’ ला देखील पाठींबा देताना दिसतो. या ट्रस्टची स्थापना २००७ मध्ये झाली होती. तेव्हापासूनच हा ट्रस्ट खूप प्रसिद्ध आहे. सलमानमुळे त्याची प्रसिद्धी अजूनच वाढली आहे.