अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूरचा लॉक’डाउन दरम्यान घडला ‘हा’ मजेशीर किस्सा..

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूरची जोडी मनोरंजन विश्वात नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते‌. २०१२ रोजी सैफा अली खान आणि करीना कपूर यांच्या विवाहसोहळा झाला. तेव्हापासून ते दोघे एकत्र वैवाहिक जीवनाचा आनंद लुटत आहेत. सैफ आणि करिना यांना बाॅलिवुडमधील पाॅवर कपल म्हणून देखील ओळखले जाते.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत सैफ अली खानने करीना कपूरबद्दलचा रंजक किस्सा सांगितला असून त्याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेली दिड वर्ष झाली कोरोनाचे संकट संपूर्ण देशात थैमान घालत आहे. त्यामुळे प्रशासन कठोर निर्बंध लादत असुन, लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता सरकार लॉकडाऊन हटवण्याचा प्रयत्न करत आहे.

दरम्यान, गेल्या वर्षभरात सुरु असलेल्या लॉकडाऊन मुळे जिम, सलुन, इतर सर्व दुकाने ही बंद ठेवण्यात आली होती. अशा परिस्थितीत मोठ-मोठ्या सेलिब्रिटींनीही या कठोर निर्बंधाचे पालन करत असल्याने त्यांनाही घरीच केस कापावे लागले होते. त्यामुळे संबंधित सैफ अली खानला प्रश्न विचारण्यात आला होता. लॉकडाऊन दरम्यान करीना कपूरचे केस तुम्ही घरीच कापले होते का? यावर सैफने खुप मजेदार किस्सा सांगत प्रतिक्रिया दिली आहे.

सैफ अली खान म्हणाला की, “मी बेबोचे केस कापले असते, तर तीने मला मारले असते. मी तिचे केस कापले असते. तर ते खराब दिसले असते. ती एक अभिनेत्री आहे. आम्ही दोघे पण एकमेकांच्या केसांशी अजिबात खेळत नाही. मात्र, करिनाने माझे केस कापले असते तर माझं सुदैवच असते. मात्र, तसे काही झाले नाही.

दरम्यान, सैफ अली खान आणि करीना लग्नाआधीच बरेच दिवस एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी २०१२ साली लग्न केलं. लग्नानंतर २०१६ मध्ये त्यांना पहिला मुलगा झाला. त्यांच्या पहिल्या मुलाच नाव तैमूर ठेवण्यात आले. तैमुर जन्मापासुनच छोटा स्टार म्हणून ओळखला जावू लागला. त्याची एक झलक पाहण्यासाठी अनेक चाहते हतबल होतात.

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात करीनाने दुसरऱ्या मुलाला जन्म दिला‌. मात्र, या मुलाला करीनाने सोशल मीडिया पासुन लांब ठेवण्याचा प्रयत्न करते तसेच तीने दुसऱ्या मुलाच नाव ही लवकर जाहीर केले नाही. गेल्या काही दिवसांपूर्वीच करीनाने दुसऱ्या मुलाच नाव ‘जेह’ असे ठेवल्याचे सांगितले आहे. जेह या शब्दाचा अर्थ शुभ आहे, म्हणजेच सकारात्मकतेचे लक्षण आहे. जेहच्या जन्मानंतर करिना सध्या ठणठणीत असुन कुटुंबासोबत मजेशीर आनंद लुटत आहे.