हार्दिक पांड्या आणि कुणाल पांड्या यांनी घेतले तब्बल ‘इतक्या’ कोटींचे अलीशान घर; किंमत वाचून व्हाल थक्क

भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि त्याचा भाऊ कुणाल पांड्या हे दोधे देखील त्यांच्या लाईफस्टाईलमुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असतात. या दोघांचा देखील प्रचंड इनकम असल्याने त्यांच राहणीमान उच्च प्रतीच आहे. नुकतच आता पांड्या बंधू दोघे देखील सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. ते म्हणजे त्यांनी घेतलेल्या नवीन अलिशान घरामुळे. पांड्या बंधूंनी नुकतच मुंबईमध्ये 8 BHK च अलिशान घर खरेदी केलं आहे. मात्र, या घराची किंमत एकूण तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार, पांड्या बंधूंनी खरेदी केलेल्या घर रुस्तमजी पॅरामाऊंटमध्ये घेतले आहे. या घराची किंमत तब्बल 30 कोटी रुपये इतकी आहे. मात्र, त्याच्या या नव्या घरामध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. ही त्यांच्या घराची खासियत आहे. यामध्ये जिम गेमिंग झोन स्विमिंग पूल त्याचसोबत वैयक्तिक थिएटर देखील आहे. बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पाटणी पांड्या ब्रदर्सच्या या नव्या घरा शेजारी राहतात.

हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या या दोघांनी आपल्या आयुष्यात प्रचंड संघर्ष केला आणि इतपर्यंत येऊन पोहचले आहेत. दोघांनी देखील एकेकाळी आर्थिक संकट पाहिली आहेत. दोघेही भाऊ मॅगी खाऊन पोट भरत होते. मात्र, आज दोघेही लग्झरी लाईफ जगत आहेत. हार्दिक पांड्या वर्षाला तब्बल 30 कोटींची कमाई करतो. तर, कृणाल पांड्या वर्षाला 15 कोटींची कमाई करतो.

हार्दिक आणि कृणाल नुकत्याच झालेल्या श्रीलंका सीरिजमध्ये खेळले. वनडेमध्ये कृणालला एकच विकेट घेता आली, तसंच त्याने 35 रनही केले. तर हार्दिकने सीरिजच्या तिन्ही वनडे खेळल्या. मात्र, त्याला 9.50 च्या सरासरीने बॅटिंग करता आली आणि 2 विकेट मिळाल्या. कृणाल पांड्याला पहिल्या टी-20 नंतर कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याला उरलेल्या 2 टी-20 खेळता आल्या नाहीत.

हार्दिक पांड्या 8 खेळाडूंसह कृणालच्या संपर्कात आला. त्यामुळे त्यालाही टी-20 सीरिजच्या उरलेल्या 2 मॅचमध्ये सहभागी होता आलं नाही. कोरोनातून बरा झाल्यानंतर कृणाल तसंच हार्दिक आयपीएलसाठी तयारी करतील. सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात युएईमध्ये आयपीएल स्पर्धा खेळवली जाणार आहे. तसंच आयपीएलनंतर लगेचच टी-20 वर्ल्ड कप देखील होणार आहे. त्यामुळे या दोघांचं लवकरात लवकर फॉर्ममध्ये येणं मुंबई इंडियन्स आणि भारतीय संघासाठी प्रचंड महत्त्वाचं आहे.

दरम्यान, हार्दिक आणि कृणाल पांड्या दोघेही श्रीलंका दौऱ्यावर एकत्र गेले होते. मात्र, दोघांनीही आपल्या क्षमतेनुसार कामगिरी केली नाही. कृणालने गोलंदाजीत थोडा प्रभाव सोडला असला तरी हार्दिक पांड्या पूर्णपणे फ्लॉप ठरला. टी-20 सामन्यादरम्यान (T20) कृणाल पांड्याला कोरोनाली लागण झाली होती. त्यामुळे संपूर्ण भारतीय संघालाच आयसोलेशनमध्ये जावे लागले होते आणि शेवटी टीम इंडियाचा या सीरीजमध्ये 1-2 असा पराभव झाला.