भारतातील ही सुंदर ५ ठिकाणे ज्या ठिकाणी तुम्ही भारतीय असून देखील जाऊ नाही शकत! जाणुन घ्या कारण…

मित्रहो अनेक लोकांना निरनिराळी ठिकाणे फिरण्याची खूप सवय असते, शिवाय खूप आवड देखील असते. भारतात देखील अनेक ठिकाणे सुंदर आहेत, अगदी डोळ्यांना थक्क करतील इतकी निसर्गरम्य त्यांची ठेवण आहे. पण भारतीयांना नेहमीच परदेशातील ठिकाणांचे आकर्षण राहिले आहे, त्यामुळे आपल्या देशातील अशा काही ठिकाणाबद्दल जास्त कोणाला माहीतच नाही जी ठिकाणे खूपच सुंदर आणि मन रमवण्यासारखी आहेत. तर मित्रहो आज आपण या लेखातून त्या अशा काही ठिकाणांची माहिती घेणार आहोत.

मित्रहो बंगलोर मधील स्थित असलेले युनो-इन हे हॉटेल खूपच प्रसिद्ध आहे, या हॉटेलचे आकर्षण अनेकांना असते. हे हॉटेल जपान मधील लोकांसाठी २०१२ बनवण्यात आले होते, पण कालांतराने हे हॉटेल विवादात अडकले. त्यामुळे २०१४ मध्ये हे हॉटेल अखेर बंद करण्याची वेळ आली.पण हे हॉटेल खूपच सुंदर होते, यांचे बांधकाम, याची ठेवण नजर लागावी अशीच होती.

Source:google

तसेच महाराष्ट्राचे शेजारील राज्य गोवा हे ठिकाण नेहमीच लोकप्रिय राहिले आहे, इथे भरपूर लोक आपले सुट्टीचे दिवस व्यथित करण्यासाठी हजर असतात. इथे फिरण्यासाठी खुपशी ठिकाणे आहेत, त्यातीलच एक ठिकाण आहे “ओन्ली फॉरेनर्स बिच”. या ठिकाणी कोणीही भारतीय जाऊ शकत नाही, इथे फक्त परदेशातील फॉरेनर्सलाच एन्ट्री आहे. तीच लोकं फक्त जाऊ शकतात तिथे. हा नियम करण्याचे कारण देखील खास आहे, “बिकनी घातलेल्या विदेशी पर्यटकांना” छेडछाड पासून वाचवण्यासाठी हा नियम करण्यात आला आहे.

Source:google

तसेच भारतातील स्वर्ग म्हणतात ते हिमालय पर्वत सुद्धा नेहमीच आकर्षण केंद्र बनलेले असते. इथे अनेक लोक पर्यटनासाठी येतात. इथे पर्यटकांची पहिली पसंद म्हणजे कसोल हे गाव, हे ठिकाण खूपच सुंदर आहे. पण मित्रहो आश्चर्य म्हणजे इथे भारतीयांना जाण्यास सक्त मनाई आहे.इथे फक्त परदेशी लोक जाऊ शकतात. हा नियम येथील कॅफे मालकाने बनवला आहे, त्याचे म्हणणे आहे की इथे येणारे जास्त करून पुरुषच असतात. ते इतर पर्यटकांना चुकीची वागणूक देतात.

Source:google

मित्रहो आणखीन एक आकर्षक ठिकाण म्हणजे अंदमान आणि निकोबार बेटे, या बेटावर एक असा आयलँड सुद्धा आहे जिथे येण्यास मनाई आहे. याचे नाव “नॉर्थ सेटिंनल आयलँड” असे आहे. विशेष म्हणजे इथे आदिवासी निवास करतात, त्यांची इथे वस्ती स्थित आहे. त्यामुळे येथील लोक किंवा हा द्वीप बाहेरील जगाशी काहीच संपर्क ठेवत नाही, म्हणून बाहेरून येणारे प्रवासी सुद्धा इथे स्वीकारले जात नाहीत. त्यामुळे इथे जाण्यास मनाई आहे.

Source:google

तसेच आणखी एक म्हणजे चेन्नई मधील लॉलीपॉप हॉस्टेल होय. हे एक हॉटेल आहे, तसेच चेन्नई मध्ये अनेक हॉटेल आहेत पण हे हॉटेल खूपच खास आहे. हे नेहमीच पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे, मात्र आश्चर्य यासाठी की इथे भारतीयांना येण्यास मनाई आहे. या हॉटेलमध्ये भारतीय अजिबात येऊ शकत नाहीत. तर मित्रहो ही ठिकाणे खूपच सुंदर आहेत, मात्र इथे भारतीय जाऊ शकत नाहीत. तर आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.