‘परफेक्ट वाईफ’ रितेश देशमुखने शेअर केला जिनिलियाचा विनोदी व्हिडिओ!

अभिनेता रितेश देशमुख सोशल मीडिया वर बराच सक्रीय आहे. तो नेहमीच काही ना काही अपडेट्स सोशल मीडिया वर शेअर करताना दिसतो. तो आणि त्याची पत्नी जिनिलिया मिळून काही ना काहीतरी भन्नाट व्हिडिओ शेअर करताना दिसतात. त्यांचे हे व्हिडिओ नेहमीच व्हायरल होताना दिसतात. आताही रितेशने असाच एक व्हिडिओ सोशल मीडिया वर शेअर केला आहे. हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होताना दिसत आहे.

‘माय परफेक्ट वाईफ’ अशी कॅप्शन देत रितेशने हा खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ मध्ये रितेशने जिनिलियाच्या एका विशिष्ट सवयीची टर उडवलेली दिसत आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला प्रसिद्द स्टॅंडअप कॉमेडियन स्टीव्ह ट्रेव्हिनो यांचा ‘परफेक्ट वाईफ, नेव्हर मेकस् सिली मिसटेक’ हा शो सुरू आहे. या शो मधील डायलॉग्स जिनिलियाला खूपच सूट होत असल्याचे दिसत आहे.

रितेशने जिनिलियाच्या त्याच एका सवयीची या व्हिडिओ मध्ये चेष्टा केली आहे. जिनिलिया आपला फोन पर्समध्ये सायलेंट मोड वर ठेवते आणि मग तिच्या लक्षात रहात नाही की तिने फोन कुठे ठेवला आहे. मग काय! ती सगळ्यांना तिचा फोन शोधायच्या कामाला लावते. शेवटी तो सापडतो तो तिच्या स्वतःच्या पर्समध्येच. किल्लीचेही काहीसे असेच होते. एखादी वस्तू ठेवायची एकीकडे आणि शोधत बसायचं भलतीकडेच. जिनिलियाच्या या सवयीची रितेश या व्हिडिओ मध्ये चेष्टा करताना दिसत आहे. व्हिडिओच्या शेवटी मात्र जिनिलिया यावर हसून तोंड लपवताना दिसत आहे. म्हणजेच तिलाही या गोष्टी पटल्या आहेत तर!

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

जिनिलिया आपल्या वस्तू कुठेतरी भलतीकडेच ठेवते आणि मग घरातल्या सगळ्यांना त्या वस्तू शोधण्याच्या कामाला लावते. त्यामुळे तिला स्वतःलाही लवकर वस्तू मिळत नाहीत आणि इतरांनाही त्रास होतो. नऊ वर्षं रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर रितेश आणि जिनिलियाने २०१३ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांना रियान आणि राहील अशी दोन मुलेही आहेत. त्यांच्या लग्नाला आता जवळपास नऊ वर्षं पूर्ण झाली आहेत. तरीही दोघांमधील प्रेम आजही टिकून आहे.

दोघांमधील हे प्रेम असेच टिकून राहू दे. या दोघांमधील गमतीजमती अजून पाहायला मिळू देत. त्यांच्या या गमतीजमतींचे अपडेट्स आम्ही तुमच्या पर्यंत अनंत राहूच. हे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या सोशल मीडिया पेजेसना फॉलो करा. तसेच तुम्हाला आमचे आवडलेले लेख लाईक आणि शेअर करायला विसरू नका.