मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा पती आहे खूपच हँडसम, पहा या जोडीचे काही खास फोटो..!

मित्रहो मराठी चित्रपट सृष्टीत अनेक अभिनेत्री कार्यरत आहेत, त्यांच्या आकर्षित करणाऱ्या अभिनयाकडे पाहिले की रसिक आपोआप प्रेमात पडतात. शिवाय त्यांची मराठमोळी सुंदरता सुद्धा भलतीच भाव खाऊन जाते. आज आपण अशीच एक मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिच्याबद्दल खास माहिती जाणून घेणार आहोत. मृण्मयीही अनेकांची लाडकी अभिनेत्री आहे, त्यामुळे तिच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.

मृण्मयी देशपांडे हीने स्लॅमबुक, नटसम्राट, कट्यार काळजात घुसली, यांसारख्या चित्रपटात अप्रतिम अभिनय केला आहे. शिवाय अग्निहोत्र, कुंकू या मालिकांतून देखील रसिकांशी संपर्क साधला आहे. तिने रसिकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे. तिने नाटक, मालिका आणि चित्रपट या तीनही माध्यमातून प्रवास करून आपल्या अभिनयाचे सादरीकरण केले आहे. तिची यातील प्रत्येक भूमिका चाहत्याना वेड लावते.

मृण्मयी सोशल मीडियावर सुद्धा नेहमी चर्चेत असते, तिचे चर्चेत राहण्याचे कारण म्हणजे ती शेअर करत असलेले फोटो. हे फोटो तिचे अनेक चाहते पाहत असतात, यामध्ये अनेकदा मृण्मयी आपल्या कुटूंबासोबत दिसून येते. आपल्या पती सोबत सुद्धा खूपसे रोमँटिक पोज मधील फोटो सुद्धा शेअर करते. त्यांच्यातील बॉंडिंग पाहून अनेकजण कौतुक करत असतात, शिवाय त्यांच्या फोटोंवर खूप छान छान कमेन्ट देखील करत असतात.

View this post on Instagram

A post shared by Mrunmayee Deshpande- Rao (@mrunmayeedeshpande)

मृण्मयीच्या पतीचे नाव स्वप्नील राव असे असून, स्वप्नील दिसायला सुद्धा खुप हँडसम आहे. स्वप्नील आणि मृण्मयी यांची जोडी खुप लोकप्रिय आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वात आवडती जोडी असून, या जोडीला अनेकांची विशेष पसंती मिळत असते. पेशाने व्यवसायिक असणाऱ्या स्वप्नील सोबत ३ डिसेंबर २०१६ रोजी मृण्मयीचे लग्न झाले होते. जेव्हा त्याने पहिल्यांदा मृण्मयीला पाहिले होते तेव्हाच तो तिच्यावर फिदा झाला होता.

तो मृण्मयीला बघायला तिच्या घरी गेला होता, तिला पहिल्यांदा त्याने पाहिले होते. तिला पाहिल्यावर तो क्षणात घायाळ झाला आणि त्याने होकार कळविला. या दोघांचे स्वभाव सुद्धा खुप छान असून एकमेकांना खूप छान समजावून घेतात ते. मृण्मयी आणि स्वप्नीलचा हा सुखी संसार असाच राहो ही सदिच्छा. त्यांच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.