‘रंग माझा वेगळा’ मधील सौंदर्याचा पती आहे हा प्रसिद्ध दिग्दर्शक..

स्टार प्रवाह या वाहिनीवर ‘रंग माझा वेगळा’ ही एक प्रसिद्ध मालिका आहे. या मालिकेमध्ये सौंदर्या इनामदार नामक एक पात्र आहे. या पात्राने मालिकेमध्ये स्वतःच्या जोरावर सौंदर्य प्रसाधनांच्या प्रोडक्ट्स ची एक कंपनी उभी करते आणि तिच्या आयुष्यात यशस्वी होते. सौंदर्या इनामदार हे पात्र मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री हर्षदा खानविलकर ही करत आहे. जाणुन घेऊयात सौंदर्या अर्थात खऱ्या आयुष्यातील हर्षदा इनामदार हिचं खरं आयुष्य नेमकं कसं आहे.

आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या हर्षदा खानविलकर हिचा २ जुलै, १९७३ चा जन्म आहे. हर्षदा मुळची मुंबई येथील रहिवासी आहे. तिने आजवर बऱ्याच चित्रपटांबरोबर मालिकेत सुद्धा काम केले आहे. खासकरून टी. व्ही. सिरियल मधून ती जास्त काळ प्रेक्षकांसमोर आली आहे.

हर्षदा ही अभिनेत्री तर आहेच पण ती एक उत्तम दिग्दर्शिका सुद्धा आहे. हर्षदाचे शालेय शिक्षण किंग जाॅर्ज स्कूल, मुंबई येथून झाले असुन माध्यमिक शिक्षण रूपारेल काॅलेज, मुंबई येथे झाले आहे. विशेष गोष्ट अशी कि हर्षदा खानविलकर काॅस्ट्युम डिजायनरही आहे.

हर्षदा खानविलकर हिने तिच्या करियरची सुरूवात एका टी. व्ही. मालिकेद्वारेच केली होती. १९९९ साली आलेली *आभाळमाया” ही तिची पदार्पणाची सिरियल ठरली. इथून सुरू झालेला तिचा प्रवास पुढे खुपच यशस्वीरित्या पुढे सरकत राहिला.” डोंबिवली फास्ट” हा तिचा पहिला वहिला मराठी चित्रपट होय.

आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर तिने आजवर अनेक कामे केली आहेत. ‘बिग बाॅस मराठी सिजन १” मध्येही तिने आपला सहभाग नोंदवला होता.

मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीचा असलेला दिग्दर्शक ज्याने आजवर “दुनियादारी”, “तु ही रे”, “प्यार वाली लव्ह स्टोरी”, “गुरु” अशी एक ना अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

दिग्दर्शक संजय जाधव हा हर्षदा खानविलकरचा पती आहे. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत असुन त्यांचा सुखाचा संसार चालु आहे. या दांपत्याला ध्रिती आणि मृणाल या दोन मुली आहेत. मालिका क्षेत्रामध्ये कमालीचा ठसा उमटवताना तिने आजवर अनेक मराठी आणि हिंदी मध्येही काम केलं आहे.

तिच्या आजवरच्या कारकिर्दीत तिने “कळत नकळत”, “उचापती”, “ऑल द बेस्ट (हिंदी)”, “माझिया प्रियाला प्रीत कळेना”, “आभाळमाया”, “अस्तित्व एक प्रेम कहानी (हिंदी)”, “दामिनी”, “दर्द (हिंदी)”, “पुढचं पाऊल”, “घाडगे & सून” या आणि अशा बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. तिच्या अभिनयाच्या जोरावर तिने अनेक चाहते कमावले आहेत. सध्या “रंग माझा वेगळा” मधून ती ज्या प्रकारे भूमिका निभावतीये त्यासाठी तिचं कौतुकच होत आहे.