‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतील जिजी अक्का आहे या सुप्रसिध्द मराठी अभिनेत्रीची सून..नाव जाणून थक्क व्हाल..

स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘फुलला सुगंध मातीचा’ या मालिकेला रसिक प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळत आहे. चित्रपट किंवा मालिका पाहत असताना अनेकांना त्या कलाकाराच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घेण्याची खूप इच्छा असते. ‘फुलला सुगंध मातीचा’ या मालिकेतील जिजीआक्का यांच नाव अभिनेत्री अदिती देशपांडे असून, या प्रसिद्ध अभिनेत्री “सुलभा देशपांडे” यांच्या सून आहेत.

अभिनेत्री “अदिती देशपांडे” यांना स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेतील जीजी आक्का या पात्राला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम व प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील कीर्ती, शुभम या मुख्य भूमिकेप्रमाणेच जिजीआक्का या भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळत आहे.

अभिनेत्री अदिती देशपांडे या प्रसिद्ध अभिनेत्री “सुलभा देशपांडे” यांच्या सून आहेत. सुलभा देशपांडे यांनी ११५ मराठी आणि २११ पेक्षा जास्त हिंदी मालिका त्यांनी गाजवल्या आहेत. यावरूनच हिंदी आणि मराठीतील मालिकेतील त्यांचा अनुभव समजतो आहे. रंगभूमीमुळेच सुलभा देशपांडे आणि अरविंद देशपांडे यांची ओळख झाली होती.

यानंतर हे दोघे दोन वर्षे एकमेकांच्या प्रेमात होते. रंगभूमी कधीही सोडणार नाही असे एकमेकांकडून वचन घेत त्यांनी लग्नगाठ बांधली. त्यांनतर या दोघांनी अनेक नाटकांत महत्वाच्या भूमिका साकारल्या. मात्र, आयुष्याची साथ देण्याचं वचन देवून, अरविंद देशपांडेंनी सुलभा देशपांडे यांची मध्येच साथ सोडली. परंतू, त्यांच्या निधनानंतर सुलभाताई न डगमगता त्यांच्या नंतरही त्यांनी रंगभूमीची अविरत सेवा अशीच चालू ठेवली.

अभिनेत्री अदिती देशपांडे यांनी “पेहरेदार पिया की” या हिंदी मालिकेमध्ये महत्वाची भूमिका बजावली होती. नॉट ओन्ली मिसेस राऊत, जोगवा, दशक्रिया यामध्ये त्यांनी अभिनित केलेल्या चित्रपटांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. अदिती देशपांडे या अतिशय अनुभवी कलाकार आहे.

दरम्यान, ‘फुलला सुगंध मातीचा’ या मालिकेतील सर्व पात्रे उत्तम भूमिका बजावतात. शुभम आणि कीर्ती यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री व अभिनेत्याला प्रेक्षक प्रचंड प्रतिसाद देत आहेत. तर जिजीआक्काला देखील प्रेक्षक भरभरून प्रेम व प्रतिसाद देत आहे.