इंदुरीकर महाराज एका कीर्तनाला मोजतात तब्बल ‘इतके’ रुपये मात्र, ते पैसे वापरतात या कामासाठी..

प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज हे फक्त कीर्तनकारच नसून समाज प्रभोधनकार देखील आहेत. त्यांच्या कीर्तनामध्ये विविध प्रकारचे विनोद करून लोकांना हसवत असतात. त्यामुळे लोकांना इंदुरीकर महाराज यांचं कीर्तन ऐकायला प्रचंड आवडते. ते नेहमी आपल्या कीर्तनातून लोकांना हसवत समाज प्रभोधनाचं काम करत असतात. म्हणूनच ते अल्पावधी काळातच महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात पोहचले आहेत.

लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील लोकांना इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ऐकायला प्रचंड आवडते. इंदुरीकर महाराज यांचा जन्म 9 जानेवारी 1972 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील इंदुरी या छोट्याश्या गावात झाला. अर्थातच 1972 ला प्रचंड मोठा दुष्काळ होता. त्यामुळे त्यांची परिस्थिती खूप हालकीची होती.

इंदुरीकर महराज यांचं शिक्षण
इंदुरीकर हे एक उच्च शिक्षित आहेत. त्यांनी बीएसी बीएड असे शिक्षण पूर्ण केल आहे. त्यानंतर त्यांनी काही दिवस त्यांनी प्राध्यापक म्हणून ही काम केलं. नंतर वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी कीर्तन करायला सुरुवात केली. त्यांनतर ते काही काळातच प्रचंड लोकप्रिय झाले आणि आज ते महाराष्ट्राच्या सुपरस्टार पेक्षा कमी नाहीत. कारण त्यांना कीर्तनाला सांगायच असेल तर, त्यांच्या पुढच्या 1 ते दोन वर्षाच्या तारखा बुक आहेत.

तुम्हाला कधी हा प्रश्न पडला का? की इंदुरीकर महाराज एका कीर्तनाला किती फीस घेत असतील. इंदुरीकर महाराज एका कीर्तनाला तब्बल सरासरी 40 ते 45 हजार रुपये इतकी फीस घेतात. अर्थातच त्यांच्या कीर्तनात अनेक कलाकारांचा समावेश त्यामुळे त्यांना जास्त मनुष्य बळ लागते.

इंदुरीकरमहाराज महिनात जवळपास 80 ते 90 कीर्तन करतात. आता तुम्हाला अंदाज आलाच असेल की, ते महिन्याला किती कमावत असतील आणि त्यांची संपत्ती किती असेल. परंतू, कीर्तनातून कमावलेला पैसे ते आपल्या शिक्षण संस्थेसाठी वापरतात. ज्ञानेश्वर माउली सेवाभावी शिक्षण संस्था असे त्या संस्थेचे नाव आहे. या संस्थेमध्ये एक मुलाला शिक्षण घेण्यासाठी फक्त 250 रुपये लागतात. त्यामध्ये कोणतीही परीक्षा फीस घेतली जात नाही. महाराज याच शिक्षण संस्थेतून समाज सेवेचं देखील काम करतात.

इंदुरीकर महराज कीर्तनातून मिळालेले पैसे शिक्षण संस्थेसाठी वापरतात. त्यामुळे अनेक गरीब मुले शिक्षणापासून वंचित न राहता उच्च शिक्षण घेत आहे. ते कीर्तन करून समाजाला ज्ञान देतात. विनोद करून लोकांना हसवतात आणि त्याचबरोबर या शिक्षण संस्थेच्या मार्फत सामाजिक प्रबोधन देखील करत आहेत.