वडिलांच्या जाण्याने फक्त स्कॉलरशिपवर केला होता कोर्स पूर्ण, न्हवते खिशात पैशे आज आहे बॉलिवूड मधील ‘सुप्रसिद्ध’ अभिनेता पण..

अभिनेते इरफान खान यांनी बॉलिवूड नाही तर हॉलिवूड मध्ये सुद्धा भरारी घेतली आहे, त्यांनी आपल्या अभिनयाने खूप साऱ्या प्रेक्षकांना आपल्याकडे आ’कर्षित केले आहे. ते म्हणतात की कलाकार तोच चांगला ज्याला डोळ्यांचा अभिनय उत्तम जमतो असाच कलाकार खरा असतो.

पण अस वाटत की इरफान खान याना ही कला त्यांच्या जन्मापासूनच मिळाली होती. २९ एप्रिलला आज त्यांची पहिली पुण्यतिथी आहे, ह्या मोक्यावर आपण त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या गोष्टी तुम्हाला आज सांगणार आहोत.

इरफान यांचा जन्म राजस्थान मध्ये जयपूर मधील मुस्लिम पठाण कुटूंबात झाला होता, पठाण कुटुंबातील असून सुद्धा इरफान लहानपणापासूनचं शाहकारी आहेत. या गोष्टीवरून त्यांचे वडील त्यांना सतत चि’डवायचे की आपल्या घरात ब्राम्हण जन्मला आला आहे, इंडस्ट्री मध्ये इरफान यायच्या आधी त्यांना खूप सारा सं’घर्ष करावा लागला आहे.

त्याचे दिल्ली स्थित नाटक स्कुल एनएसडी मध्ये ते सिलेक्ट झाले होते. त्याचवेळी त्यांच्या वडिलांचा मृ त्यू झाला आणि त्यांना मिळणारी पॉकेट मनी सुद्धा बंद झाली. एनएसडी मध्ये मिळणाऱ्या फेलोशिप द्वारे त्यांनी आपला कोर्स पूर्ण केला.

बॉलिवूड मध्ये अभिनयासाठी प्रसिद्ध असणारे इरफान खान यांनी आपला हॉलिवूड मध्ये सुद्धा चांगलाच जम बसवला होता, खूप क’ष्ट बघितल्यानंतर त्यांना ‘सलाम बॉम्बे’, फिल्ममध्ये खूपच छोटासा रोल मिळाला. आपल्या ह्याच रोलने सर्वाना आकर्षित करणारे इरफान खान यांनी यानंतर कधीच मागे पाहिलं नाही.

त्यानंतर ते  ‘द वारियर’, ‘मकबूल’, ‘हासिल’, ‘द नेमसेक’, ‘रोग’, ‘पान सिंह तोमर’, ‘द लंचबॉक्स’,  ‘तलवार’, ‘लाइफ ऑफ पाई’, ‘मुंबई मेरी जान’, ‘साहेब बीवी आणि गैं’गस्टर रिटर्नस’, ‘हिंदी मीडियम’ अश्या सुप्रसिद्ध फिल्म्समुळे इरफानने फिल्ममध्ये आणि दर्शकांनमध्ये चांगलीच ओळख बनवली.

२०११ मध्ये त्यांना भारत सरकार द्वारे पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. असा हा इरफान याचा मागील वर्षी मृ त्यू झाला होता तर तुम्हला इरफान कसा वाटतो हे आम्हाला नक्की कळवा.

त्याचबरोबर इरफान खान हॉलिवूड फिल्म्समध्ये देखील सक्रिय होते, त्यांनी ‘स्पाइडर मैन’, ‘जुरासिक वर्ल्ड’ आणि ‘इन्फर्नो’ अश्या जगप्रसिद्ध फिल्म्समध्ये काम केलं आहे.

हॉलिवूड अभिनेता टॉम हैंक्स एकावेळी इरफानच्या अभिनयाकडे पाहत असताना त्याला जाणवले की इरफानचे डोळे देखील अभिनय करतात. इरफान खान याना ‘पान सिंह तोमर’, साठी २०१३ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. इरफान खान यांची आयुष्यातील शेवटची फिल्म म्हणजे ‘अंग्रेजी मीडियम’ यात ते दिसले होते.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.