‘तारे जमीन पर’ मधील ईशान आता दिसतो असा! दर्शीलचा नवीन लूक व्हायरल…

२००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तारे जमीन पर’ चित्रपटाने प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव दिला. आपल्या मुलांकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन पालकांना या चित्रपटाद्वारे मिळाला. कोणतंही मूल हे वाईट नसतं. प्रत्येक मुलाला आपल्या आईवडीलांची तेवढीच माया आणि प्रेम हवं असतं. प्रत्येक आईवडिलांसाठी आपलं प्रत्येक मूल हे सारखंच असलं पाहिजे. प्रत्येक मूल स्पेशल असतं. फक्त हे समजून घेणारी व्यक्ती त्यांच्या आयुष्यात असायला हवी.

‘तारे जमीन पर’ चित्रपटातील ईशानच्या आयुष्यात अशीच एक समजून घेणारी व्यक्ती आली आणि त्याच्यातल्या कलाकाराने आपली कला दाखवून दिली. आईच्या जवळ असणारा, वडिलांना खूप घाबरणारा, शाळेत जायला कंटाळा करणारा, दिवास्वप्नं पाहणारा, त्याला प्रोत्साहन देणारी व्यक्ती भेटल्यावर बहरून येणारा हा छोटा ईशान साकारला होता बालकलाकार दर्शील सफारीने. त्याने ही भूमिका साकारली तेव्हा तो केवळ १० वर्षांचा होता.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Darsheel Safary (@dsafary)

इतक्या लहान वयातही त्याने ही भूमिका खूप सुरेख साकारली होती. त्याला या भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर क्रिटिक्स अवॉर्ड मिळाला होता. त्यानंतर त्याने बम बम बोले (२०१०), झोक्कोमॉन (२०११), मिडनाईट्स चिल्ड्रेन (२०१२) यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. काही मालिकांमध्येही त्याने काम केले. त्याच्या कामाचे नेहमीच कौतुक झाले आहे.

अलीकडेच त्याने सोशल मीडिया वर आपला एक फोटो शेअर केला. त्याच्या या नवीन लूकवर त्याच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. पांढरा टी-शर्ट आणि चष्मा असा त्याचा लूक आहे. थोडीशी वाढलेली दाढी आणि काहीसे अस्ताव्यस्त केस त्याला शोभून दिसत आहेत. त्याच्या या फोटोवर त्याच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Darsheel Safary (@dsafary)

‘तू इंडियन मनी हाईस्ट मधील प्रोफेसरची भूमिका करायला हवीस’ अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली आहे. एका नेटकऱ्याने आश्चर्य व्यक्त करत ‘तारे जमीन पर मध्ये हा कसा होता आणि आता कसा दिसतोय’ अशी कमेंट केली आहे. दुसऱ्या एका नेटकऱ्यानेही काहीशी अशीच प्रतिक्रिया देत ‘काय होतास तू, काय झालास तू’ चा सूर लावला. अनेकांना तर तो ओळखूच येत नाहीये, तर काहींना लहानपणीचा दर्शीलच जास्त आवडलेला दिसला. त्याचा हा बदललेला लूक अनेकांना आवडूनही गेला आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Darsheel Safary (@dsafary)

काय मग मंडळी, तुम्हाला कसा वाटला दर्शीलचा हा लूक? आम्हाला तुमचे मत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तसेच आमचे आवडलेले लेख लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका.