‘जय भीम’ मधील सेंगनी खऱ्या आयुष्यात दिसते अशी! फोटो पाहून विश्वास बसणार नाही…

ऍमेझॉन प्राईम वर नुकताच ‘जय भीम’ हा तमिळ चित्रपट प्रदर्शित झाला. सत्य घटनेवर आधारीत या चित्रपटाने प्रेक्षकांना अंतर्मुख करून सोडले आहे. सध्या या चित्रपटाची सर्वच स्तरांवर चर्चा होताना दिसत आहे. अभिनेता सूर्या या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसत आहे. चंद्रू नावाच्या एका वकीलाची भूमिका तो निभावत आहे. मात्र या चित्रपटातील अजून एका कलाकाराची चर्चा जास्त होताना दिसत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Lijomol Jose (@lijomol)

चित्रपटात राजकन्नुला अटक झाल्यानंतर कथा त्याची पत्नी सेंगनीबरोबर पुढे सरकत राहते. आपल्या पतीच्या सुटकेसाठी गरोदर असूनही धावपळ करणारी सेंगनी साकारली आहे अभिनेत्री लिजोमोल जोसेने. एका आदिवासी जमातीतील स्त्री, असहाय्य पत्नी अशा विविध रंगछटा लिजोमोलने खूप सुंदर साकारल्या आहेत. राजकन्नुच्या अटकेनंतर कथेचा भार सेंगनीच्या खांद्यावर येऊन पडतो, जो लिजोमोलने खूप उत्तम सांभाळला आहे. या चित्रपटातील लिजोमोलचा गेटअप खूप वेगळा आहे. प्रत्यक्ष आयुष्यात मात्र ती खूपच वेगळी दिसते.

प्रामुख्याने मल्याळम आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या लिजोमोलने २०१६ मध्ये ‘महेशीन्ते प्रतिकारम’ या मल्याळम चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. २०१९ मध्ये तिने तमिळ चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. फार कमी काळ इंडस्ट्री मध्ये असली, तरी लिजोमोलने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप पाडली आहे. कट्टपनयिले रित्विक रोशन, हनी बी २.५, स्ट्रीट लाईट्स, प्रेमसूत्रम, तिथम नांद्रम, जय भीम अशा चित्रपटांमधून तिने तिच्या अभिनयातील ताकद दाखवून दिली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Lijomol Jose (@lijomol)

‘जय भीम’ मधील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक करावे लागेल. समोर सूर्या आणि प्रकाश राज यांच्यासारखे महारथी असताना आपल्या भूमिकेची वेगळी छाप पाडणं ही अवघड गोष्ट लिजोमोलने लीलया पार पाडलेली दिसते. ‘जय भीम’ मधील तिची सेंगनीची भूमिका विशेष छाप पाडून जाते. यातील तिचा मेकअप आणि गेटअप तिच्या इतर चित्रपटांपेक्षा वेगळा आहे. प्रत्यक्षात ती खूपच सुंदर दिसते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Lijomol Jose (@lijomol)

लिजोमोलच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर तिने ५ ऑक्टोबर २०२१ रोजी अरुण अँटोनी ओनिसेरील बरोबर लग्नगाठ बांधली. लिजोमोलचे अभिनय कौशल्य पाहता आपण लवकरच तिला विविध प्रकारच्या चित्रपटांमध्ये पाहू शकू अशी खात्री आहे. तर मित्रहो, तुम्हाला तिचा एकूणच अभिनय आणि ‘जय भीम’ मधील तिची व्यक्तिरेखा कशी वाटली, हे आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर कळवा. तसेच आमचे तुम्हाला आवडलेले लेख लाईक आणि शेअर करायला विसरू नका.