या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेता झाला अटक..कारण ऐकून थक्क व्हाल….

मित्रहो हल्ली सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अनेक बातम्या थक्क करून सोडतात, याद्वारे खूप काही कानावर पडत असते. नुकताच एक घटना समोर आली असून सर्व नेटकरी याची जोरदार चर्चा करत आहेत. या घटनेमध्ये एका लोकप्रिय मालिकेतील अभिनेता देखील समोर आला आहे, त्यामुळे तर हे प्रकरण आणखीनच चर्चेत येत आहे. मित्रहो ही मालिका म्हणजे “संत गजानन शेगावीचे” आहे, या मालिकेने गेली कित्येक काळ प्रेक्षकांना आपली सवय लावली आहे. मालिकेतील प्रत्येक भूमिका खूप काही चांगलं शिकवून जाते.

पण भूमिकेतून सत्कर्म शिकवणाऱ्या यातीलच एका कलाकाराने सत्य जीवनात मात्र एक घोर चूक केली आहे. म्हणून तर त्याला अटक झाली असून, ही बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरत आहे. मित्रहो हे कलाकार आहे मराठी अभिनेता जितेंद्र पोळ, यांना कोल्हापूर येथील राजाराम पुरी पोलिसांनी अटक केली आहे.जितेंद्र हे “संत गजानन शेगावीचे” या मालिकेत दामोदरपंत ही भूमिका साकारत आहे. त्यांच्या भूमिकेला अनेकजण पसंती देतात, त्यामुळे या मालिकेतून ते प्रसिद्ध झाले आहेत.

जितेंद्र हे कोल्हापूर येथेच वास्तव्य करतात, त्यांनी सोशल मीडिया माध्यमातून एका विवाह संस्थेमध्ये नाव नोंदवले होते. त्याच संस्थेमध्ये नाव नोंदवलेल्या एका महिलेसोबत त्यांनी संपर्क साधला. हळूहळू त्यांचे बोलणे सुरू झाले, त्यांची ओळख झाली. नंतर मग जितेंद्र यांनी त्या महिलेला लग्नाची मागणी घातली, पण त्या महिलेने त्यांची मागणी नाकारली व त्यांना नकार दिला. पण पुढे जितेंद्र तिला पुन्हा पुन्हा विचारत होते, तीच्या कामाच्या ठिकाणी जाऊन तिला बोलत होते.

पुढे पुढे तर तिच्या येण्या जाण्याच्या वाटेवर थांबून तिची वाट अडवणे, अश्लील बोलणे अस सुरू झालं. सारखे सारखे तिच्याशी संपर्क साधण्याचा जितेंद्र प्रयत्न करू लागले. यामध्ये अश्लील कृत्य देखील वाढू लागल्याने त्या महिलेने कोल्हापूर राजाराम पुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. म्हणून तेथील पोलिसांनी जितेंद्र यांना अटक केली आहे. ही खबर सोशल मीडियावर सुद्धा वाऱ्यासारखी पसरत आहे. अनेक नेटकरी जितेंद्र यांच्या या कृत्यावर कमेन्ट करत आहेत.

जितेंद्र यांनी अनेक मालिकेतून प्रेक्षकांना भेट दिली आहे, त्यांच्या अभिनयाच्या अनेक भूमिका आपल्या पाहायला मिळाल्या आहेत. तसेच त्यांनी खूपशा चित्रपटात देखील काम केले आहे, त्यांनी स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत सुद्धा काम केले आहे, तसेच सवित्रीज्योती , क्रिमीनल्स, जुळता जुळता जुळतंय की, श्री गजानन शेगावीचे यांसारख्या निरनिराळ्या मालिकेतुन जितेंद्र पडद्यावर झळकले आहेत. मात्र आता जितेंद्र या कारणाने सोशल मीडियावर खूप चर्चेत आले आहेत. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.