‘तारक मेहता का…’ मधील जेठालालच्या घरी वाजणार सनई-चौघडे! सुरू झाली लगीनघाई…

छोट्या पडद्यावर गेली अनेक वर्षं एक मालिका प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करताना दिसत आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही आहे ती मालिका. यातील सगळ्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या अगदी घरच्यासारख्या होऊन गेल्या आहेत. त्यामुळे या व्यक्तिरेखा आणि त्या साकारणारे कलाकार प्रेक्षकांना अगदी आपलेसे वाटतात. या कलाकारांच्या व्यक्तिगत आयुष्यातील गोष्टींमध्ये त्यामुळेच प्रेक्षकांना खूप रस आहे. या कलाकारांच्या खासगी आयुष्यात घडणाऱ्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी देखील प्रेक्षकांना जाणून घ्यायच्या असतात. हे कलाकार प्रेक्षकांच्या मनाच्या खूप जवळचे असल्याने या कलाकारांच्या आयुष्यात कोणतीही चांगली गोष्ट घडली, की प्रेक्षकांना आनंद होतो.

अशीच एका कलाकाराच्या खासगी आयुष्यातील आनंदाची बातमी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतील एका कलाकाराच्या घरी सध्या लग्नाची लगबग पाहायला मिळत आहे. मालिकेतील जेठालाल म्हणजेच अभिनेते दिलीप जोशी यांच्या घरी ही लग्नसराईची गडबड पाहायला मिळत आहे.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की दिलीप जोशी यांच्या घरी नक्की कुणाच्या लग्नाची तयारी सुरू आहे. तर ही तयारी आहे त्यांच्या मुलीच्या लग्नाची. फार कमी लोकांना दिलीप जोशी यांच्या खासगी आयुष्याबद्दल माहिती आहे. मालिकेत जेठालाल यांना टिपेन्द्र गडा उर्फ टप्पू नावाचा एक मुलगा आहे. खऱ्या आयुष्यात दिलीप जोशी यांना दोन मुले आहेत. त्यांच्या मुलाचे नाव ऋत्विक जोशी असून मुलीचे नाव नियती जोशी आहे. दिलीप जोशी यांची मुलगी नियती यंदा लग्नबंधनात अडकते आहे. ११ डिसेंबरला नियतीचे लग्न आहे. नियतीचा होणारा नवरा हा एक एनआरआय आहे. मुंबई मधील ताज हॉटेल मध्ये हा विवाह सोहळा पार पडणार असल्याचे सांगण्यात येते.

या लग्नसोहळ्याबद्दल इतर माहिती अजून उपलब्ध होऊ शकलेली नाही. मात्र आपल्या एकुलत्या एक मुलीचे लग्न दिलीप जोशी नक्कीच धुमधडाक्यात लावणार, हे नक्की. या लग्नाला ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेची सगळी टीम जाणार की नाही, हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र सध्या लग्नामुळे दिलीप जोशी यांच्या घरात बरीच लगबग सुरू असलेली पाहायला मिळत आहे.

तुमच्या आवडत्या कलाकारांच्या खासगी आयुष्यातील अशाच काही गोष्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. अशा बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या सोशल मीडिया हॅन्डल्सना फॉलो करा.