कधीकाळी १०० रुपयांसाठी केले होते काम ६ महिने काम, परंतु आता आहेत इतक्या कोटींहून अधिक संपत्तीचे मालक..

मित्रहो बॉलिवूड मध्ये अनेक सुप्रसिद्ध अभिनेते होऊन गेले आहेत तर काहीजण अजूनही कार्यरत आहेत. त्यापैकीच असणारे लोकप्रिय अभिनेते जितेंद्र, यांच्याबद्दल आपण आज एक खास माहिती जाणून घेणार आहोत. जितेंद्र यांनी बॉलिवूड मध्ये भरपूर ओळख मिळवली आहे, त्यांनी चित्रपट सृष्टीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आज त्यांच्याकडे करोडोंचा बँक बॅलन्स आहे पण आज जो किस्सा आम्ही सांगणार आहोत त्यांमध्ये जितेंद्र यांनी करिअरच्या सुरुवातीला १०० रुपये घेऊन फिल्म साइन केली होती.

हा किस्सा सुप्रसिद्ध अभिनेते अनु कपूर यांनी कथन केला होता. त्यांनी सांगितले की फिल्ममेकर वी शांतरांम यांच्याकडे जितेंद्र काही कामासाठी गेले होते, पण तेव्हा शांताराम यांच्याकडून जितेंद्र याना काम मिळाले नाही. पण काही दिवस गेल्यानंतर शांताराम यांनी स्वतः फोन करून जितेंद्र यांना बोलवून घेतले होते. त्यावेळी त्या चित्रपटाचे नाव “सेहरा” असे होते, ही फिल्म १९६३ मध्ये प्रदर्शित झाली होती. त्यावेळी जितेंद्र यांना सांगण्यात आले होते की फिल्मच्या शुटिंग दरम्यान रोज इथे यायचे.

ज्यादिवशी कोणी ज्युनिअर आर्टिस्ट गैरहजर राहील त्यादिवशी तुला तिथे काम मिळेल. या कामासाठी जितेंद्र यांना त्यावेळी महिन्याला १०५ रुपये मिळत होते. जितेंद्र यांचे खरे नाव रवी कपूर होते पण शांताराम यांनी त्यांचे नाव बदलून जितेंन्द्र ठेवले. सेहरा चित्रपटापासून जितेंद्र यांना काही खास फायदा झाला नाही. पण वी शांताराम यांनी आपला आगामी चित्रपट “गीत गाया पत्थरोने” यामध्ये लीड ऍक्टर च्या रुपात काम दिले होते.

त्यावेळी शांताराम यांनी जितेंद्र यांना काम देत असल्याने पैसे मात्र कमी मिळणार असे सांगितले होते. जितेंद्र यांना ब्रेक देण्यात येत होता. त्यामुळे त्यावेळी जितेंद्र यांनी १०० रुपये घेऊन फिल्म साइन केली होती. पण तेव्हा जवळपास ६ महिन्यांपर्यंत पैसे मिळाले न्हवते. पण आता जितेंद्र करोडपती आहेत, जवळपास १५०० कोटोंची त्यांच्या कडे प्रॉपर्टी आहे. अनेक बंगले, वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या त्यांच्याकडे आहेत. तसेच भरपूर लोक त्यांना पसंत करतात त्यामुळे आजही ते एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता आहेत. त्यांना आणखीन आयुष्य लाभो ही सदिच्छा.

तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.