नवरी मिळे नवऱ्याला! जुईली जोगळेकर आणि रोहित राऊत अडकले लग्नबंधनात…

सुप्रसिद्ध गायक सारेगमप मधून आपल्या आवाजाची झलक दाखवून अख्या महाराष्ट्रात नाव मिळवलेले गायक रोहित राऊत अखेर लग्नबंधनात अडकले. आज म्हणजेच रविवार २३ जानेवारी २०२२ रोजी गायक रोहित राऊत याचे गायिका जुईली जोगळेकर यांच्यासोबत विवाह झाला. या लग्नामधील फोटो काही सेलेब्रिटीनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत. याचबरोबर स्वतः जोडप्यानी देखील हे फोटो पोस्ट केले आहेत या फोटोमध्ये ते खूप सुंदर नजर लावावी असे दिसत आहेत. पुण्यातील प्रसिद्ध ढेपेवाडा याठिकानी रोहित व जुईलीचा लग्नसोहळा पार झाला. या शाही विवाहसोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत.

मागील खूप दिवसांपासून जुईली आणि रोहित यांच्या लग्नाचे विधी चालू होते त्यांच्या या विधीमध्ये अभिनेत्री मिताली मयेकर आणि अन्य सेलेब्रिटी लोक आवर्जून उपस्थित होते. सर्वात आधी ग्रहमख, साखरपुडा, संगीत, मेहंदी, हळद अशा सर्व कार्यक्रमांचे फोटो व्हायरल झाले होते. त्यातील अभिनेत्री मिताली मयेकरने काही फोटो शेअर केले होते. आत्ता या दोघांच्या लग्नाबद्दलची चर्चा नेटवर उडत आहे. त्यांचे फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. नवदांम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट केली आहे ज्यात त्याने गायक रोहित राऊत चा फोटो पोस्ट केला आहे. आणि त्याच्या कॅपशन मध्ये त्याने ‘बापरे लग्न!’ अस टाकलं यासोबत त्याने रोहित राऊत चा फोटो जोडला आहे. रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांचे सुमारे ८ वर्ष रिलेशनशिप सुरू होते. मागील व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी त्यांनी फोटो शेअर करत याबद्दलची कबुली दिली. रोहितची पत्नी ही सुद्धा एक प्रसिद्ध गायिका आहे. ‘सूर नवा ध्यास नवा’ या शो मध्ये तिने कमाल दाखवली होती.

View this post on Instagram

A post shared by Juilee Joglekar (@juilee.sangeet)

२००९ च्या सुमारास सारेगमपचा पहिला सिजन पार पडला होता. त्या पहिल्या सिजनचा विजेता गायक रोहित राऊत ठरला होता. त्यानंतर त्याची एक चांगला गायक म्हणून इंडस्ट्रीत ओळख निर्माण झाली. याच शोमध्ये जुईली जोगळेकर स्पर्धक म्हणून रोहित राऊतच्या विरुद्ध होती या शो दरम्यान त्यांची ओळख झाली आणि याचे रूपांतर प्रेमात झाले. त्यांची दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते.