बाबो हळद लागली..!! जुईली जोगळेकरचे फोटो झाले सोशल मीडियावर व्हायरल…

मित्रहो कलाक्षेत्रात हल्ली अनेक जण विशेष चर्चेत येत आहेत, काहीजण चित्रपटांमुळे चर्चेत येत आहेत तर काहीजण प्रेमविवाहामुळे चर्चेत येत आहेत. नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झालेले जुईली चे फोटो पाहून चाहत्यांच्यात चर्चेला उधाण आले आहे. जुईली जोगळेकर आणि रोहित राऊत गेले कित्येक दिवस सोशल मीडियावर विशेष चर्चेत आहेत, त्यांची लव्हस्टोरी अनेकांचे लक्ष वेधत आहे. हे दोघेही अनेकांना आवडतात, शिवाय सोशल मीडियावर त्यांचे फॉलोअर्स सुद्धा भरपूर आहेत.

जुईली आणि रोहितने आता लग्न करण्याचे ठरवले असून, त्यांच्या सर्व पोस्ट हल्ली त्यासंदर्भात असतात. त्यामुळे अनेक नेटकरी त्यांना लग्नाच्या भरभरून शुभेच्छा देताना दिसून येत आहेत. त्या दोघांचीही आता लगीन घाई सुरू आहे, खूपशा पोस्टमधून आपणाला त्यांची ही घाई सहज पाहायला मिळते व अनेक लोक याचा आनंद घेत आहेत. नुकताच जुईलीने एक फोटो शेअर केला असून त्यामध्ये आपण पाहू शकतो की नवरीबाईला हळद लागलेली आहे.

जुईली खरच खूप खुश आहे, तिने अगदी नॅचरल स्माईल देऊन हळद लावून फोटो काढला आहे जो अनेकांना आकर्षित करत आहे. सर्वानाच यांच्या लग्नाची उत्सुकता लागली असून, खूप दिवस झाले त्यांची ही जोडी विशेष चर्चेत आहे. इंस्टा ग्राम अकाउंटवर या गायिकेचे फोटो सर्वत्र शेअर होत आहेत. रोहित आणि जुईली हे दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात. ती दोघे अनेक वर्षे एकमेकांना डेट करत आहेत.

ही जोडी मनोरंजन क्षेत्रातील सर्वात लाडकी जोडी आहे, अनेकजण या जोडीला पसंत करतात. या दोघांनीही खूप आधीच आपलं हे नातं ऑफिशियल केलं आहे त्यामुळे त्यांची ही प्रेमकथा कोणापासून लपलेली नाहीच. ते दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात, नेहमी एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत असतात त्यावरून त्यांच्या प्रेमाचा काहीसा अंदाज आपणही बंधू शकतो.

त्यांच्या या लग्नाची घाई अनेकांना आकर्षित करत आहे, नवरीच्या चेहऱ्यावरची हळद पाहून खुपजण छान छान कमेंट करत आहेत. तसेच सोशल मीडियावर त्या दोघांनाही भरपूर शुभेच्छा दिल्या जात आहेत. प्रेमाचा हा त्यांचा गाडा आता लग्नाच्या मांडवापर्यंत पोहचला आहे, तो असाच आयुष्यभर एकत्र राहो ही सदिच्छा. रोहित आणि जुईलीला खूप खूप शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.