काजोल देवगणची सासर स्टोरी..! या कारणांमुळे सासू आहे फुगून, बोलत सुद्धा नाही.? वाचा कारण…

मित्रहो बॉलिवूड मध्ये खूपशा अशाही जोड्या आहेत ज्यांना अगदी नजरच लागेल. त्यातीलच एक म्हणजे काजोल आणि अजय देवगण होय. या जोडीने खरच प्रेम करून ते निभवायला शिकवलं आहे. त्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे. काजोल आणि अजय यांच्यातील बॉंडिंग अनेकांना आवडते, त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा आजही लोक आवडीने करतात. सोशल मीडियावर हे दोघेही नेहमी सक्रिय असतात, शिवाय काजोल आणि तिची फॅमिली आपणाला सोशल मीडियाच्या माध्यमातून खूपदा पाहायला मिळते.

आज आपण काजोलच्या लग्नानंतर आलेल्या अनुभवांबद्दल बोलणार आहोत. काजोलचा स्वभाव जवळपास सर्व बॉलिवूड आणि चाहत्यांना ठाऊकच आहे, शिवाय तिला खूपसे लोक जवळून ओळखतात. मात्र अजय हा सुद्धा किती शांत आहे हे आपणाला विसरून चालणार नाही. तो सुरुवातीपासून खूप शांत आहे, त्यामुळे यावरूनच आपण त्याच्या घरच्या वातावरणाची कल्पना करू शकतो की त्यांच्या घरी एरवी सुद्धा किती शांती असेल.

काजोल एका मुलाखतीत सांगते की जेव्हा अजय सोबत तिचे नवीन लग्न झाले होते तेव्हा तिला देवगण कुटुंबात मिसळायला खूप वेळ लागला होता. तिथे असणारी शांती तिला गप्प करत होती, त्यामुळे मनासारखं राहायला भीती वाटत होती. अजय देवगणने देखील एका मुलाखतीत सांगितले आहे, त्यांच्या कुटुंबात काजोल ही एकटीच बडबडी आहे. ती खूप बोलते. त्यामुळे जेव्हा काजोल नवीन नवीन आली होती तेव्हा तिला आपल्या सासू सोबत पटवून घेताना थोडं अवघड गेले होते.

मात्र अजयची आई विना देवगण यांचा स्वभाव देखील खूप गोड आहे, त्यांनी काजोलला खूप छान पध्दतीने सांभाळून घेतले. शिवाय काजोलने सुद्धा आपली अशी काही जादू त्यांच्यावर केली की विना तिच्या जवळच्या मैत्रीण बनून गेल्या. जेव्हा काजोल लग्न झाले होते तेव्हा सुद्धा सासूला आंटी म्हणत होती, यावर विना यांचा काही आक्षेप न्हवता मात्र त्यांच्या मैत्रिणीने एकदा यावरून काजोलला सुनावले होते. पण तेव्हा विना यांनी काजोलची बाजू घेत म्हणले की जेव्हा काजोल मला ममी म्हणेल तेव्हा अगदी ती मनापासून म्हणेल.

काजोल आणि अजय हे दोघेही खूप छान कलाकार आहेत, शिवाय त्यांनी आपले वैवाहिक जीवन सुद्धा उत्तमरीत्या सांभाळले आहे. ते उत्कृष्ट कलाकार तर आहेतच शिवाय, खूप छान प्रेमवीर आहेत, उत्तम पती पत्नी आहेत आणि आता तर चांगले आई वडील देखील आहेत. अगदी सर्व नात्यात त्यांनी आपली भूमिका खूप छान निभावली आहे. त्यांना त्यांच्या आयुष्यात सगळे सुख मिळो ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.