काजोलने मुंबई मधील हे अपार्टमेंट दिले भाड्याने, दरमहा भाडेकरूकडून घेणार एवढी रक्कम..

काजोल सध्या रुपेरी पडद्यापासून दूर आहे. पण ते अनेकदा ती कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत येत असते. पुन्हा एकदा ती अशीच एका कारणामुळे चर्चेमध्ये आली आहे. म्ही विचार करत असाल की काजोलने नवीन चित्रपट साईन केला असेल, पण तसे नाही.

वास्तविक, तिने पवई येथे त्यांची सदनिका भाड्याने दिली आहे. आणि त्या बदल्यात भाडेकरूकडून दरमहा सुमारे ९० हजार रुपये भाडे घेणार आहे. तिचा हा अपार्टमेंट ७७१ स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे. मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, हे अपार्टमेंट हिरानंदानी गार्डन्सच्या अटलांटिक प्रोजेक्टच्या २१ व्या मजल्यावर आहे. या अपार्टमेंटचा भाडेपट्टा आणि परवाना करार ३ डिसेंबर रोजी नोंदणीकृत झाला होता.

कागदपत्रांनुसार भाडेकरूने ३ लाख रुपये सुरक्षा रक्कम जमा केली आहे. एक वर्षानंतर भाडे वाढवले ​​जाईल. एका वर्षानंतर त्याचे भाडे ९६७५० रुपये प्रति महिना असेल. काजोल पती अजय देवगणसोबत आलिशान बंगल्यात राहते. शिवशक्ती असे या बंगल्याचे नाव आहे. ५९० स्क्वेअर फूट पसरलेला हा बंगला अजयने सुमारे ६० कोटीला विकत घेतला होता.

आजकाल इंडस्ट्रीतील बहुतेक सेलिब्रिटी त्यांचे अपार्टमेंट भाड्याने देत आहेत. काजोलच्या आधी प्रियांका चोप्रा, अमिताभ बच्चन, सलमान खान यांच्यासह अनेक स्टार्सनी त्यांचे अपार्टमेंट भाड्याने दिली आहेत. जॅकलिन फर्नांडिस ही प्रियांका चोप्राची भाडेकरू आहे. त्याच वेळी, अमिताभ बच्चन यांनी त्यांचे डुप्लेक्स क्रिती सेनॉनला १० लाख रुपये प्रति महिना भाड्याने दिले आहे. सलमान खानने वांद्रे पश्चिम येथील शिवस्थान हाइट्समध्ये आपला अपार्टमेंट भाड्याने दिला आहे. त्यासाठी ते दरमहा ९५ हजार रुपये भाडे आकारत आहेत.