एखाद्या बॉलिवूड स्टारसारखे आयुष्य जगतो कपिल शर्मा! आहे करोडोंची संपत्ती…

छोट्या पडद्यावर कपिल शर्मा या नावाची आपली एक वेगळीच जादू आहे. आपल्या विनोदी अंदाजात तो भल्याभल्यांची फिरकी घेताना दिसतो. कधी कधी कलाकार त्याचीही फिरकी घेतात. मात्र कपिल अगदी हसतमुखाने या सगळ्या गोष्टींना सामोरा जातो. सध्या कपिल शर्मा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

कपिल शर्मा मूळचा पंजाबमधील अमृतसरचा आहे. १० वर्षं त्याने रंगभूमीवर काम केले आहे. कपिल एका सामान्य कुटुंबातील मुलगा आहे. त्याची घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची होती. करिअरच्या सुरुवातीची अनेक वर्षं त्याने स्ट्रगल करण्यात घालवली आहेत. मात्र आपल्या मेहनतीने आणि चिकाटीने त्याने आज हे यश, पैसा आणि प्रसिद्धी मिळवली आहे.

सध्या कपिल कोट्यवधींचा मालक आहे. त्याचा केवळ इन्कम टॅक्सच कोटींच्या घरात जातो. एकदा त्याने ट्विटरवर तो दरवर्षी १५ कोटी रुपये रक्कम केवळ इन्कम टॅक्स भरतो असे सांगितल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. सुरुवातीला ‘द कपिल शर्मा शो’ च्या पहिल्या सिझनसाठी कपिल ६० ते ७० लाख रुपये मानधन घेत असे. मात्र नंतर त्याने त्याची लोकप्रियता पाहता ही मानधनाची किंमत ३० टक्क्यांनी वाढवत १ कोटी इतकी केली आहे.

अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींप्रमाणे कपिल देखील मुंबईमध्ये आलिशान घरामध्ये राहतो. मुंबईतील त्याचा फ्लॅट हा जवळपास १५ कोटी रुपयांचा आहे. याशिवाय पंजाब मध्येही त्याचा एक सर्व सोयीसुविधांनीयुक्त असा एक बंगला आहे, ज्याची किंमत तब्बल २५ कोटी इतकी आहे. कपिलकडे अनेक महागड्या कार्स आहेत. त्याच्याकडे मर्सिडीज कार आहे, ज्याची किंमत १.१९ कोटी आहे. याशिवाय त्याच्याकडे व्होल्वो एक्ससी ही महागडी कार देखील आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

आज कपिल ज्या ठिकाणी आहे, तिथे पोहोचण्यासाठी कपिलने खूप मेहनत घेतली आहे. २००६ हे वर्ष कपिलसाठी खास होते. त्याने ‘हंस दे हंसा दे’ या कॉमेडी शो मध्ये भाग घेतला होता. २००७ मध्ये त्याने ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कॉमेडी शो च्या तिसऱ्या पर्वामध्ये भाग घेत आपल्या विनोदकौशल्यांची जादू दाखवली. २०१० ते २०१३ च्या दरम्यान तो ‘कॉमेडी सर्कस’ या शो मध्ये झळकला. या शो ने त्याला प्रसिद्धी मिळवून दिली. त्याने अनेक अवॉर्ड शो देखील होस्ट केले आहेत. सध्या तो ‘द कपिल शर्मा शो’ मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे.