‘कपिल शर्मा शो’ फेम चंदू चायवाल्याने खरेदी केली नवी आलिशान XUV 700, पहा फोटो.

मित्रहो हिंदी कलाक्षेत्रात अनेक रियालिटी शो नेहमीच चर्चेत असतात, या शो द्वारे रसिकांचे निखळ मनोरंजन होत असते. असाच एक शो ज्याने देश विदेशातील प्रेक्षकांच्या मनात सुद्धा आपली आवड निर्माण केली आहे. हा शो म्हणजे “कपिल शर्मा शो” आहे, या कॉमेडी शो ने हास्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे अनेक प्रेक्षक या शो ला भरभरून प्रतिसाद देत असतात, शिवाय यातील कलाकार देखील उत्कृष्ट अभिनय साकारणारे आहेत. म्हणून तर हा शो पाहताना निखळ मनोरंजन होत असते.

View this post on Instagram

A post shared by Chandan Prabhakar (@chandanprabhakar)

आज आपण या शोमधील एका कलाकाराबद्दल खास माहिती घेणार आहोत. मंडळी तुम्हाला “कपिल शर्मा शो” मधील चंदू चायवाला तर माहीतच असेल, त्याच्यामुळे नेहमीच या कार्यक्रमातील रंगमंच फुलतो आणि विनोदाला जोड मिळत जाते. हा चंदू चायवाला म्हणजेच चंदन प्रभाकरने नुकताच एक नवी कार खरेदी केली आहे, त्याने याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अनेक नेटकरी फोटो पाहून त्याच्या कारचे कौतुक करत आहेत.

सोशल मीडियावर हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत, शिवाय त्याची ही कार अनेकांना आवडली आहे. चंदनला वेगवेगळ्या गाड्यांची खुप आवड आहे त्यामुळे त्याच्याकडे भरपूर गाड्यांचे कलेक्शन आहे. सध्या त्याने XUV 700 ही कार घेतली असून याची किंमत २० लाख इतकी सांगितली जात आहे. फोटोमध्ये आपण पाहू शकतो की ही कार खूप आलिशान वाटत आहे, शिवाय हीचा निळा रंग तर तिच्यावर आणखीनच खुलून दिसत आहे. ही सुंदर कार पाहून सोशल मीडियावर अनेकांनी छान छान कमेन्ट केल्या आहेत.

गाड्यांची आवड जपणाऱ्या चंदनकडे BMW 3 Series 320D यांसारख्या गाड्या आहेत. अभिनय प्रिय चंदन हा एका शो साठी जवळपास ५ ते ७ लाख रुपये मानधन घेतो. त्याचे मुंबई मध्ये घर आहे, त्या घराला खरच मायेची ऊब लागली आहे. म्हणून तर त्या घराची निगा , सौंदर्य, स्वच्छता पाहून मन प्रसन्न होते. या सर्वाचे श्रेय त्याच्या पत्नीला जाते कारण तिने हे घर खूप व्यवस्थित ठेवले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चंदन कडे १५ कोटींची मालमत्ता आहे. तो गेल्या कित्येक वर्षांपासून कपिल शर्मा शो मध्ये कार्यरत आहे. हा शो गेली भरपूर वर्षे रसिकांचे मनोरंजन करत आहे, शिवाय पोटभर हसण्यास प्रवृत्त करणारा हा शो बघता बघता प्रेक्षकांचा आवडता बनला आहे. या शो मधून चंदन देखील मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवली आहे. यामध्ये काम करणारा प्रत्येक कलाकार विशेष लोकप्रिय आहे. त्यामुळे प्रत्येकाचा एक वेगळा चाहता वर्ग आहे.

या शो प्रमाणे चंदनने काही चित्रपटात सुद्धा काम केले आहे, त्याने “भावनाओं को समझो”, “पावर कट” “डिस्को सिंग” “जज सिंह एलएलबी” यांसारख्या चित्रपटात आपल्या अभिनयाची जादु दाखवली आहे. त्याच्या विनोदी बुद्धीचे अनेकजण चाहते आहेत. त्याचा हा स्वतंत्र चाहता वर्ग असाच वाढीस लागून राहो ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.