करीना कपूरचे नाईट डिनर पार्टीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, पहा फोटो

बाॅलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर तिच्या ग्लॅमरस फोटो आणि चित्रपटांमधील अॅकटींगमुळे नेहमीच चर्चेत असते. या बरोबरच ती तिच्या स्टाईलीश लूकने अनेक चाहत्यांच्या मनावर भूरळ घालते. करीना कपूर सोशल मीडियावर सतत अॅक्टीव्ह असुन नेहमीच तिच्या  कुटुंबासह फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करत असते.

करीना मित्र आणि मैत्रिणीसोबत ही तितकेच मनमोहन आनंद लुटत दिसत असते. करीनाने नुकतीच नाईट डीनर पार्टी सेलिब्रिट केली असून, तिने अनेक फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहे. करीना कपूर खानने तिच्या इंस्टाग्रामवर अकाउंट वरुन हे फोटो अपलोड केले असून त्या फोटोंमध्ये संडे नाईट पार्टीची झलक दाखवली आहे.

अमृता अरोरा, मलायका अरोरा, महेप कपुर, मल्लिका भट या तिच्या जीवलग मित्र मैत्रींसोबत ती दिसत आहे. यावेळी करीनाची बहिण आणि अभिनेत्री करिश्मा कपूर या ग्रुपमधे कुठेही दिसत नाहीत. फोटो अपलोड करताना करीनाने हार्ड शेप ईमोजी वापरुन ते अपलोड केले आहेत. करीनाच्या चाहत्यांना लोखो लाईक आणि कमेंट्सचा पाऊसच पाडला आहे.

दुसरा फोटो शेअर करताना अगदी बोल्ड सीन्स शुट केलेला असुन, सर्वजण बोल्ड पोज देत आहेत. या फोटोमध्ये मलायका आउटफिट दिसत असुन खूप ग्लॅमरस दिसत आहे. त्याचवेळी करिना एक ग्रे आउटफिट बोल्ड पोज देताना दिसत आहे. अमृता सिंग देखिल राखाडी टि-शर्ट आणि काळ्या रंगाचा शाॅर्ट घातलेला आहे. ती त्या ड्रेसमधे गोंडस दिसत आहे.

महेप कपूर आणि मल्लिका भटचा फोटो अपलोड करताना तिने लव इमोजी देखील टाकल्या आहेत. करीना कपूरने काही व्हिडिओ पोस्ट केले आहे त्यात ती मित्रांसोबत कॅन्डलाईट पोज देताना दिसत आहे. करीना प्रेमाने डोक्यावरून हात फिरवत पोज देते व अमृता बेबोला मिठी मारताना दिसत आहे. याला कॅप्शन करिनाने ‘कमबक्त इश्क’ असे दिले आहे.

दरम्यान, फोटोमध्ये सर्वं मुलींची गॅंग दिसत असुन, प्रत्येक जण आरशासमोर उभा राहिलेल्या दिसत आहेत. करीना आता नव्या लुकमधे झळकणार असुन तीच्या सोबत अमिर खान असनार आहे. लवकरच ‘लाल सिंग चड्डा’ हा तिचा नवा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असल्याची चर्चा सध्या मनोरंजन क्षेत्रात सुरू आहे.