‘दोन मुलांना जन्म देऊन थकले मी!’ करिनाची हळवी व्यथा…

करिना कपूर खान हे नाव सध्या बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं. बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी करिना एक आहे. २०१२ मध्ये जेव्हा तिने अभिनेता सैफ अली खान सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा बॉलिवूड मध्ये बरीच खळबळ माजली होती. सैफ हा करिना पेक्षा जवळ जवळ १० वर्षांनी मोठा आहे. त्यामुळेच या दोघांच्या लग्नाचा निर्णय ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं होतं. मात्र तरीही सैफिना आपल्या मतावर ठाम राहिले आणि दोघांनी लग्न केले.

हा लग्नसोहळा बराच थाटामाटात पार पडलेला पाहायला मिळाला. पतौडी खानदानाने अगदी राजेशाही पद्धतीत हे लग्न लावले होते, तर कपूर घराण्यानेही आपल्या नावाची शान राखत लग्नाला एक प्रकारची रंगत आणली होती. बॉलिवूड मधील अनेक गाजलेल्या लग्नांमधील हे एक लग्न होते. या लग्नाची बरीच चर्चा झाली होती. आजही सैफिना कपल हे बॉलिवूड मधील एक लोकप्रिय कपल म्हणून ओळखलं जातं.

करिना कपूर खान सोशल मीडिया वर बरीच सक्रीय असते. अलीकडेच तिने सोशल मीडिया वर एक फोटो शेअर केला. यामध्ये ती योगा करताना दिसत आहे. या फोटोबरोबरच तिने एक लांबलचक कॅप्शन देखील लिहिली आहे. यामध्ये ती म्हणते, “माझा योगा प्रवास हा २००६ मध्ये सुरू झाला होता. त्यादरम्यान मी टशन आणि जब वी मेट हे चित्रपट करत होते. मात्र आता मी दोन मुलांना जन्म दिल्याने खूप थकून गेले आहे. परंतु तरी देखील मी हरणार नाही. मी पूर्वीसारखी होण्याचा अवश्य प्रयत्न करणार.”

‘टशन’ (२००८) आणि ‘जब वी मेट’ (२००७) चित्रपटांमध्ये करिनाला पाहिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. या चित्रपटांसाठी तिने बरीच मेहनत घेऊन ‘झिरो फिगर’ बनवली होती. या झिरो फिगरचा नंतर ट्रेंड आला. करिना कपूर मुळेच हा ट्रेंड त्यावेळी व्हायरल झाला होता. तिला इतकी बारीक झालेली पाहिल्यानंतर अनेक मुलींना आपलीही झिरो फिगर असावी अशी स्वप्नं पडू लागली होती.

गमतीचा भाग सोडला, तर अशी झिरो फिगर बनवण्यासाठी आणि ती मेंटेन ठेवण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागतात. आपल्या चित्रपटांसाठी करिनाने हे कष्ट खूप गंभीरपणे घेतलेले दिसून आले. लग्नानंतर तिने २०१६ मध्ये तैमूर आणि २०२१ मध्ये जहांगीर अशा दोन गोंडस मुलांना जन्म दिला. आपली पूर्वीची फिगर परत मिळवण्यासाठी करिना खूप प्रयत्न करत असल्याचे तिच्या सोशल मीडिया पोस्ट्स वरून दिसून येते.