अखेर मोहम्मद कैफने त्याच्या आणि कतरीनामध्ये असलेल्या नात्याबद्दल केली पोलखोल! ‘कैफ’ नावामागची कथा…

आपल्या लगीनघाईमुळे सध्या बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ चर्चेत आहे. काही बातम्यांनुसार, कतरीना कैफ आणि विकी कौशल येत्या डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लग्नबंधनात अडकतील. या लग्नामुळे मीमर्सना फारच चेव चढला असून एका वेगळ्याच गोष्टीचे मीम्स सध्या सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसत आहेत. नक्की काय आहे ही भानगड? चला पाहूया.

अभिनेत्री कतरीना कैफ आणि माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यांच्यातील आडनाव साम्यामुळे अनेकदा या दोघांचे नाव एकत्र जोडण्यात आले आहे. दोघांच्याही सारख्याच आडनावाचे रहस्य काय असू शकेल, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला होता. बॉलिवूड आणि क्रिकेटचे फार जवळचे नाते असल्याने कतरीना आणि मोहम्मद यांच्यात भविष्यात कोणते नाते निर्माण होऊ शकते का, असा प्रश्न सारखाच विचारला जात होता.

Third party image reference

मात्र मोहम्मद कैफने यावर उत्तर दिले आहे. एका युजरने ट्विटरवर मोहम्मद कैफला विचारले होते, की ‘सर, तुमच्यात आणि कतरीना कैफ मध्ये काही नाते आहे का? तसं नसेल, तर भविष्यात असं काही नातं तयार होऊ शकतं का?’ यावर मोहम्मद कैफने उत्तर दिलं होतं, की ‘अजून तरी नाही. बाकी, माझं लग्न झालं असून मी माझ्या संसारात सुखी आहे. पण कतरीनाच्या आडनावाबद्दल मी एक इंटरेस्टिंग स्टोरी ऐकली आहे. त्या स्टोरीनुसार, माझ्या नावाशी तिचे काहीतरी कनेक्शन आहे.’

इंटरनेट वर कतरीनाच्या आडनावाबद्दल एक स्टोरी ऐकवली जाते. कतरीनाच्या आईचे नाव सुझान तोरक्वीत असून वडीलांचे नाव मोहम्मद कैफ होते. कतरीनाचे आईवडील तिच्या लहानपणीच वेगळे झाले. त्यामुळे कतरीना नेहमी आपल्या आईचे आडनाव ‘तोरक्वीत’ वापरत असे. २००३ मध्ये कतरीनाने ‘बूम’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिचं आडनाव उच्चारण्यासाठी खूप कठीण असल्याने चित्रपटाच्या निर्मात्या म्हणजेच अभिनेते जॅकी श्रॉफची पत्नी आयेशा श्रॉफ यांनी तिला आडनाव बदलण्याची सूचना केली. त्यावेळी मग कतरीनाने आपल्या वडीलांचे आडनाव ‘कैफ’ वापरण्यास सुरुवात केली.

त्याच दरम्यान मोहम्मद कैफ टीम इंडियाकडून खेळत होता. एका प्रसिद्ध खेळाडूचे आडनावही ‘कैफ’ असल्याने कतरीनाला बॉलिवूडमध्ये जम बसवण्यास मदत होईल, तसेच चाहत्यांना तिचे नाव लक्षात ठेवणेही सोपे होईल या हेतूने आयेशा श्रॉफ यांनी कतरीनाच्या ‘कैफ’ आडनावाला मंजुरी दिली. कतरीनाने जर तिचे पहिले ‘तोरक्वीत’ आडनाव वापरले असते, तर लोकांना तिचे नाव उच्चारणे कठीण झाले असते आणि तिच्या लोकप्रियतेत फरक पडला असता.