व्हायरल होत आहे कतरिना कैफचे मंगळसूत्र! सोशल मीडियावर चर्चा…

अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल या स्टार जोडीने ९ डिसेंबर २०२१ रोजी लग्नगाठ बांधली. प्रसार माध्यमांकडे या लग्नाचे खास कव्हरेज नसले तरी हे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलेले पाहायला मिळाले. कतरिना आणि विकी दोघांनीही आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वरून आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले होते. हे फोटो सोशल मीडिया वर बरेच व्हायरल झालेले पाहायला मिळाले.

त्यानंतर कतरिनाच्या ख्रिसमस लूकचीही बरीच चर्चा झाली. कतरिना आणि विकी या दोघांनीही या फोटोच्या माध्यमातून आपले प्रेम व्यक्त केले आहेत. या फोटोचीही सोशल मीडिया वर बरीच चर्चा झाली. कतरिनाचा लग्नानंतरचा हा पहिलाच सण होता. दोघांनीही आपल्या घरच्यांसोबत आणि मित्रमंडळींसोबत ख्रिसमस साजरा केला होता. हा फोटो देखील सोशल मीडिया वर व्हायरल झालेला पाहायला मिळाला.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

आता कतरिनाच्या नवीन फोटोची चर्चा होताना दिसत आहे. कतरिनाने नुकताच आपला मंगळसूत्र घातलेला फोटो सोशल मीडिया वर शेअर केला आहे. तिच्या या मंगळसूत्राची चर्चा सध्या सोशल मीडिया वर रंगलेली पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये तिने स्वेटर हुडी घातलेली पाहायला मिळत आहे. त्यावर तिने आपले छोटेसे पण नाजूकसे मंगळसूत्र घातलेले आहे. आपले लांबसडक केस तिने मोकळे सोडले आहेत. या फोटोमध्ये कतरिना खूपच गोड दिसत आहे.

तिच्या या फोटोवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रेटींनीही कमेंट्स केल्या आहेत. अभिनेत्री कविता कौशिकने कमेंट करत लिहिले आहे, की आता तर बायकाही म्हणत आहेत की मी विकी असते तर बरं झालं असतं. अभिनेत्री नेहा धुपियाने कतरिनाच्या या पोस्ट वर हार्ट इमोजी टाकल्या आहेत. अनेक चाहत्यांनी या पोस्ट वर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेक मुलींनी यावर कमेंट करत मंगळसूत्राच्या डिझाईनचे कौतुक केले आहे.

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्यातील अफेयरच्या चर्चा नेहमीच सुरू असत. मात्र दोघांनीही स्वतःहून यावर कधीच शिक्कामोर्तब केलं नाही. त्यांच्या लग्नाची बातमीही फार उशिरा समोर आली. दोघांनी राजस्थानमध्ये लग्न केल्यानंतर मुंबईमध्ये कोणालाही लग्नाचे रिसेप्शन दिलेले नाही. मात्र आता विकी आणि कतरिना आपल्या सोशल मीडिया वरून आपल्या नवविवाहित आयुष्यातील गोष्टी शेअर करताना दिसतात.

काय मग मंडळी, आवडलं का कतरिनाचं हे नवीन मंगळसूत्र तुम्हाला? आपल्या बायकोला लग्नाच्या वाढदिवसाची भेट म्हणून अशा प्रकारचं एखादं मंगळसूत्र तुम्हीही भेट देऊ शकताच.