कतरिना-विकीचा पहिला ख्रिसमस साजरा झाला रोमँटिक पद्धतीने! फोटो झाले व्हायरल…

या महिन्यातच म्हणेजच डिसेंबर मध्ये एका लग्नाची अचानक बातमी आली आणि सगळेच आश्चर्यचकित झाले. हे लग्न होतं अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशलचं. ९ डिसेंबरला या दोघांनी डेस्टिनेशन वेडिंग करत राजस्थानमध्ये आपला हा शाही विवाह सोहळा पार पाडला. या लग्नाची खूप चर्चा झाली. कतरिना आणि विकीने नंतर आपल्या लग्नाचे फोटोही सोशल मीडिया वर शेअर केले होते. या फोटोंना भरभरून पसंती मिळताना दिसली.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

आताही या दोघांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देत दोघांनी लिहिले आहे, ‘मेरी ख्रिसमस’. या फोटोमध्ये विकी आणि कतरिनाने एकमेकांना मिठी मारली आहे. दोघेही खूप खूष दिसत आहेत. मागे ख्रिसमस ट्री सजवलेला दिसत आहे. दोघांमधले हे रोमँटिक क्षण चाहत्यांना फार आवडून गेले आहेत. चाहत्यांसह अनेक सेलिब्रेटींनीही या दोघांच्या फोटोंवर कमेंट्स केल्या आहेत.

कतरिनाची जवळची मैत्रीण अनिता श्रॉफ अदजानियाने ‘लव्ह यू टू! मेरी ख्रिसमस!’ अशी कमेंट केली आहे. श्लोक शर्मा, अंगद बेदी, ताहिरा कश्यप, झोया अख्तर, अलंक्रिता सहाय, रॉनी लाहिरी, बेअर ग्रिल्स, नेहा धुपिया, अर्जुन कपूर, विक्रांत मेस्सी अशा अनेक सेलिब्रेटींनी या पोस्ट वर कमेंट केल्या आहेत. चाहत्यांनी देखील लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. ‘तुमच्या दोघांच्या उंचीतला फरक खूप क्यूट आहे’ अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर कतरिनाला विकीच्या मिठीत बघून एका नेटकऱ्याने ‘ही जगातली सगळ्यात नशीबवान मुलगी आहे’ अशी कमेंट केली आहे. तर दुसरीकडे एका नेटकऱ्याने ‘काय म्हणता… माझी जळतेय’ अशी देखील कमेंट केली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

लग्नानंतरचा कतरिना आणि विकीचा हा पहिला सण. त्यांनी तो आपल्या कुटुंबाबरोबर साजरा करत एकमेकांबरोबर रोमँटिक क्षण एन्जॉय केलेले पाहायला मिळाले. कतरिना दरवर्षी खूप उत्साहात ख्रिसमस साजरा करत असते. यंदा तिने तो आपल्या सासरच्या मंडळींबरोबर साजरा केला. ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी विकीच्या घरी त्याचे कुटुंबीय आणि मित्रमंडळीही उपस्थित होती. सगळ्यांनी ख्रिसमसचा डिनर सोबत केला.

दोघांचे हे रोमँटिक फोटो सध्या सोशल मीडिया वर खूप व्हायरल होताना दिसत आहेत. दोघांमधील प्रेम या एका फोटोमधून दिसून येत आहे. चाहत्यांनाही ही जोडी खूप आवडून गेली आहे. आपल्या लग्नानंतर कतरिना कैफ आणि विकी कौशल आपल्या आपल्या कामावर परतले आहेत.