कॅटरिना कैफची छोटी बहीण पाहिली का.? दिसते तिच्या इतकीच सुंदर, पहा दोघींचे मोहक फोटो.

मित्रहो बॉलिवूड मध्ये अनेक अभिनेत्री सक्रिय आहेत, त्यांच्या सौंदर्याचे इथे अनेकजण चाहते आहेत शिवाय त्यांचे अभिनय कौशल्य देखील अप्रतिम असल्याने अगदी जगभर त्यांचे विशेष कौतुक होते. आज आपण अशाच एका सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री बद्दल बोलणार आहोत, ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून आपली आवडती कॅटरिना कैफ आहे. जिने मागील वर्षी अभिनेता विक्की कौशल सोबत लग्न केले आहे, मात्र आजही तिच्या लग्नाची चर्चा रंगलेली असतेच. त्यांचा हा विवाह अगदी थाटामाटात झाला होता त्यामुळे याची झगमग आज देखील डोळ्यात साठली आहे.

कॅटरिना ही आपल्या निराळ्या अंदाजातून नेहमीच लक्षवेधी ठरली आहे, तिने आजवर अनेक चित्रपटात काम केले आहे. तिची प्रत्येक अदा खूपच सुंदर आहे. सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते, अनेक फोटो ती आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत असते. अनेक लोकांनी तिला फॉलो केले असल्याने तिचे सर्व फोटो सर्वत्र व्हायरल होतात. त्यामुळे सोशल मीडियावर कॅटरिना आपल्या खाजगी जीवनाबद्दल देखील सर्वाना माहिती देत असते. तिच्या कुटुंबाचे सुद्धा फोटो आपणाला पाहायला मिळतात.

मित्रहो तुम्ही कॅटरिनाला तर पाहिले आहेच आज आपण तिच्या छोट्या बहिणीचे सुद्धा काही फोटो पाहणार आहोत. तिची लहान बहीण देखील खूपच सुंदर आहे, अगदी तिच्या सारखीच दिसते. तिचे नाव इसाबेल कैफ असे आहे, आपल्या बहिणीसारखीच तिलाही अभिनयाची आवड आहे त्यामुळे लवकरच ती सुद्धा या कलाविश्वात पदार्पण करणार आहे. इसाबेल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, त्यामुळे तिची फॅन फॉलोविंग सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. तिने आपले अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Isabelle Kaif (@isakaif)

इसाबेल ही एक ब्रिटिश अभिनेत्री आणि मॉडेल आहे, तसेच आता लवकरच ती सिनेमा सृष्टीत येणार आहे. तिने एका मुलाखतीत सांगितले आहे की गेल्या काही काळापासून ती हिंदी शिकण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच सांगण्यात आले आहे की ती लवकरच अभिनेता पुलकित सम्राट सोबत “सुस्वगतं खुशमदीद” या चित्रपटात झळकणार आहे. याचे काही फोटो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. हे फोटो पाहून अनेक प्रेक्षकांनी उत्सुकता प्रकट केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Isabelle Kaif (@isakaif)

कॅटरिना आणि इसाबेल या दोन्ही बहिणी खूपच छान दिसतात, त्यांचे अनेक फोटो नेहमी पाहायला मिळतात. अनेक लोक या दोघींचेही चाहते आहेत, त्यांना खूप पसंत करतात. कॅटरिना तर बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहेच शिवाय आता इसाबेल देखील लवकरच लोकप्रिय आणि प्रसिद्ध होईल. दोघी बहिणी सुंदर देखील आहेत आणि अभिनय कौशल्याने भरीव आहेत, त्यामुळे आता इसाबेलला पडद्यावर पाहण्यासाठी अनेकजण खूप उत्सुक आहेत. तिच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.