करोडोची ऑफर मिळून देखील हि प्रसिद्ध अभिनेत्री चित्रपटामध्ये देत नाही कधी किसिंग सीन..कारण..

मित्रहो हल्ली चित्रपट सृष्टीचा विषय निघाला की सामान्य माणूस सुद्धा नाक मुरडतो. तसेच या क्षेत्रात कार्यरत असणारे कलाकार सुद्धा आपणाला कधी कधी मोजकेच आवडतात. कारण पूर्वी मनोरंजन क्षेत्र आपणाला नेहमीच आकर्षित करत होते, इथे खूप काही नवीन शिकायला मिळत होते. मात्र हल्ली याची पातळी खूप घसरताना दिसते आहे शिवाय डायरेक्टर सुद्धा पातळी विसरून खूपसे सिन करायला भाग पाडतात. त्यामुळे सहकुटुंब बसून पाहण्यासारखे चित्रपट हल्ली खूप कमी मिळतात.

मात्र अशा परिस्थितीत सुद्धा काही कलाकार असेही आहेत ज्यांना आपल्या अभिनयाची मर्यादा जाणवते, समोर असणाऱ्या प्रेक्षकांची मने कळतात. काही कलाकार आपल्या या कामात जाणीवपूर्वक अटी लागू करतात. जस की अभिनेता अक्षय कुमार रविवारी शूटिंग करत नाही तसेच अन्य कलाकार सुद्धा वेगवेगळे नियम स्वतःला लावून घेतात त्यामुळे त्यांच्या कडे पाहण्याचा दृष्टीकोन देखील प्रत्येकाचा निराळा असतो. त्यातीलच एक दाक्षिणात्य अभिनेत्री हल्ली अनेकांचे मन जिंकत आहे.

ही अभिनेत्री म्हणजे कीर्ती सिंग होय. तिने आपल्या निरागस सौंदर्यातून आणि अभिनयातून विशेष लोकप्रियता मिळवली आहे. तिचा स्वभाव, साधे राहणीमान आणि विचार अनेकांना आकर्षित करतात. तिला कधीच आपल्या श्रीमंत असण्याचा किंवा, कलाकार असण्याचा गर्व वाटत नाही. ती नेहमीच एक साधी माणूस म्हणून जगते….जे कोणालाही तिच्याकडे ओढल्या वाचून राहत नाही. तिला चित्रपटातील किसिंग सिन करायला आवडत नाही.

डायरेक्टर किर्तीला करोडोंची ऑफर देत असतात, मात्र तरीही ती कोणत्याच चित्रपटात किसिंग सिन करत नाही. आता लवकरच तिचा अजय देवगण सोबतचा “मैदान” चित्रपट प्रदर्शित होणार आहे, तिचा हा पहिलाच हिंदी चित्रपट असून आता कीर्ती बॉलिवूड मध्ये पदार्पण करणार आहे. अनेकांना तिची बॉलिवूड मधील एन्ट्री पाहण्याची उत्सुकता आहे. तिचा हा नवा चित्रपट कोणती कथा घेऊन समोर येतो हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

सोशल मीडियावर कीर्ती नेहमीच सक्रिय असते, शिवाय तिच्या साध्या राहणीमानावर अनेकजण फिदा आहेत. तिची नेहमी सोशल मीडियावर चर्चा सुरू असते. आजवर तिचे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले असले तरीही आकाशाला कवेत घेतलेली कीर्ती अजूनही आपल्या जमिनीशी घट्ट बांधून आहे स्वतःला. तिचा हाच स्वभाव आणि विचार जगात अजूनही माणुसकी आहे हे दर्शवतो. तिच्या भावी आयुष्यासाठी तिला भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.