क्रेझ संपेना! खली झाला आता पुष्पा म्हणाला, “मैं नहीं झुकेगा..” चाहते म्हणाले झुकवायला तुझी मान खूप मोठी आहे..

मित्रहो सोशल जगतात कधी कोणती क्रेज निर्माण होईल याचा पत्ता लागत नाही. तसेच चित्रपट सृष्टी आणि सोशल मीडिया यांच्यात एक अतूट नाते निर्माण झाले आहे, त्यामुळे कलाक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्व कलाकारांच्या बद्दल सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू असते. सध्या तर सर्वत्र पुष्पा आणि पुष्पाचे सर्व कलाकार भलतेच चर्चेत आले आहेत. हा चित्रपट देशपातळीवर मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होताना दिसत आहे शिवाय यातील सर्व गाणी, डॉयलॉग विशेष लक्षणीय आहेत. रसिक या चित्रपटाला भरभरून प्रेम देत आहेत.

कोरोणामुळे कंटाळवाण्या झालेल्या वातावरणाला उत्साहित बनवण्याचे काम या चित्रपटाने केले असून खूपशा थिएटर बाहेर रसिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते आहे. मनाला क्षणभर भारावून टाकणारे याचे कथानक पाहून, सर्वजण खूप खुश आहेत. तसेच यातील गाणी आणि यावर अनेक प्रकारचे बोलके, हसरे जोक सुद्धा लोक आपापल्या कलेप्रमाणे करत सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर मनोरंजन करत आहेत, शिवाय “श्रीवल्ली..” गाण्यातील स्टेप तर अनेकांचे लक्ष वेधत आहे.

तर नुकताच सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, नेटकरी भलतेच चर्चेत गुंतले आहेत. हा व्हिडीओ “द ग्रेट खली..” यांचा आहे, खली यांनी देखील “पुष्पा” मधील एक डॉयलॉग म्हणून चाहत्यांचे विशेष मनोरंजन केले आहे.त्यांनी आपला हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर टाकला आहे, आतापर्यंत ४ लाखांहून अधिक वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे. तसेच हा व्हिडीओ लाईक देखील झाला आहे. यामध्ये रसिकांच्या आवडीचाच डॉयलॉग खली यांनी देखील म्हणला आहे.

View this post on Instagram

A post shared by The Great Khali (@thegreatkhali)

अल्लू अर्जुनचा तो डॉयलॉग “मै नहीं झुकेगा” हा डॉयलॉग खली रिक्रिएट करताना दिसून येतात. त्यांचा यामधील आवाज, अभिनय पाहून नेटकरी अनेक वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. खूपशा मजेशीर कमेंट देखील आहेत, ज्यातून आणखीनच मनोरंजन होत आहे. हा डॉयलॉग भरपूर प्रसिद्ध झाला आहे, अनेकजण यावर रिल्स बनवत आहेत. शिवाय यातील अनेक मजेशीर घटना चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात दिसत आहे.

गेली कित्येक दिवस सोशल मीडियावर हा चित्रपट विशेष चर्चेत आहे, याची क्रेज दिवसेंदिवस वाढतच चालली असुन याच्या संदर्भात अनेक गमतीदार व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. द ग्रेट खली यांचा हा व्हिडीओ सुद्धा आता अनेकांच्या नजरेत आला असून सर्वत्र लोकप्रिय होत आहे. तुम्हीही हा व्हिडीओ नक्की पहा, तसेच आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा तसेच आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.