कलासृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ गायिका रंगकर्मी कीर्ती.! यांचे आकस्मित दुःखद निधन…

मित्रहो नुकताच मनोरंजन क्षेत्रातून एक दुःखद बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गायन क्षेत्रातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय असलेल्या ज्येष्ठ गायिका रंगकर्मी कीर्ती यांचे निधन झाल्याची खबर ऐकून अनेकजण खूप भावुक झाले आहेत. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे. अवघ्या ६० वर्षाच्या मनोरंजन क्षेत्रातील कामगिरी साठी त्यांना लोक खूप पसंद करतात. त्यांनी आपल्या आवाजाने अनेकांना आपलेसे केले असून, अगदी रसिकांच्या काळजाला हात घातला होता.

कीर्ती शिलेदार या ७० वर्षीय होत्या. त्यांनी तब्बल त्यापैकी आपले ६० वर्षे मनोरंजन सृष्टीला दिले होते. जे ६० वर्षे त्यांची आता आठवण बनून उरलेत. अगदी वयाच्या १० व्या वर्षी त्यांनी या क्षेत्रात पदार्पण केले होते. इतक्या लहान वयात असताना पासून त्यांनी कलेची सांगड खूप छान पद्धतीने घातली होती. कीर्ती यांचा अभिनय देखील मनावर एक निराळीच जादू करतो. त्यांच्या अभिनयात अनेकजण सहज मग्न होऊन जातात, तसेच त्यांचा मधुर आवाज सुद्धा अगदी तल्लीन करून टाकतो.

कीर्ती आता ७० वर्षाच्या होत्या, त्यांनी वयाच्या दहाव्या वर्षांपासून आपल्या कलेच्या सादरीकरणाची सुरुवात केली होती. आपल्या गायनातून आणि अभिनयातून त्यांनी आजवर विशेष प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवली आहे. अनेक रसिक त्यांच्या आवाजाचे चाहते आहेत, जणू त्यांचा आवाज थेट हृदयाला हाक देतो. तसेच त्यांचा अभिनय सुद्धा मनात सहज घर करतो. आजवर त्यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे, तसेच खूपशी गाणी देखील गायली आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही बातमी विशेष लक्षणीय ठरत असून, अनेक लोक ही बातमी ऐकुन थक्क झाले आहेत. सोशल मीडियावर खुपजण त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत, शिवाय त्यांच्या गोड गोड आठवणी सुद्धा आठवत आहेत. त्यांचे अभिनय खरच अगदी मनाला भावणारे होते, त्यांनी आजवर आपल्या आवाजाने अनेकांचे मन भावुक करून ठेवले होते. त्यामुळे अभिनय प्रेमी असणारे सर्व रसिक आता दुःखी झाले आहेत.

एका १० वर्षाच्या मुलीपासून ते ७० वर्षाच्या गायिकेपर्यंतचा त्यांचा हा प्रवास खरच खूप काही शिकवण्यासारखा आहे. हा प्रवास आजपर्यंत येऊन ठेपला होता, आज सकाळी त्यांची प्रकृती खालावल्याने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. जरी ते आपल्यात नसले तरीही त्यांच्या आवाजातुन त्या नेहमीच आपल्या आठवणीत जगत राहतील. आमच्याकडून कीर्ती शिलेदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली……!!