क्रांती रेडकरच्या आलिशान घराची सफर! खूपच सुंदर आहे क्रांतीचे घर…

सध्या अभिनेत्री क्रांती रेडकर आणि तिचे पती समीर वानखेडे यांच्या नावांची खूप चर्चा सुरू आहे. सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला ड्र’ग्ज प्रकरणी अ’ट’क करण्यात आली. समीर वानखेडे हे याच प्रकरणाशी संबंधित आहेत. बॉलिवूडमधील अं’म’ली पदार्थांच्या रॅ’के’टची ते चौकशी करत आहेत. मात्र आर्यन खान अ’ट’क प्रक’रणा’नंतर त्यांच्यावर ला’च’खो’रीचे आ’रो’प करण्यात आले आहेत. सध्या या प्रकरणाचीही चौकशी सुरू आहे.

या सगळ्या गदारोळात क्रांती रेडकर मात्र आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी असलेली पाहायला मिळाली. इतकेच काय, तर तिने चक्क मुख्यमंत्र्यांना याप्रकरणी साकडे घातले आहे. या प्रकरणामुळे चर्चेत आलेली क्रांती सोशल मीडिया वर बरीच सक्रीय असलेली पाहायला मिळते. आपले विविध फोटो ती शेअर करत असतेच, त्याचबरोबर अनेक विनोदी व्हिडिओ देखील ती शेअर करताना दिसते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar)

हल्ली जरी क्रांती चित्रपटांमध्ये कमी दिसत असली तरी तिने स्वतःचा व्यवसाय सुरू केला असून ती त्यात बरीच व्यस्त असल्याचेही पाहायला मिळत आहे. क्राकर (KraKar) आणि झिया झायदा (ZiyaZyda) असे दोन ब्रॅंड्स तिने लाँच केले आहेत. या ब्रॅंड्सचे सोशल मीडिया वर जोरदार प्रमोशन करताना ती दिसते. कपडे आणि ज्वेलरीचे हे ब्रॅंड्स आहेत. ‘झिया झायदा’ हा ब्रँड तिने आपल्या जुळ्या मुलींच्या नावावरून सुरू केला आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar)

क्रांती रेडकर बऱ्याचदा आपल्या घराचेही फोटो सोशल मीडिया वर शेअर करताना दिसते. तिच्या प्रशस्त गच्चीतून दिसणारा मनमोहक सूर्यास्त ती नेहमीच कॅमेऱ्यात कैद करत असते आणि सोशल मीडिया वर आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करत असते. मुंबईमध्ये तिचे हे आलिशान घर आहे. आपल्या प्रशस्त गच्चीत तिने काही झाडे देखील लावली आहेत. या गच्चीत तिने लाकडी सोफा ठेवला असून शेजारी एक टेबल देखील पाहायला मिळते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar)

तसेच तिच्या गच्चीच्या भिंतीवर बऱ्याच फोटोफ्रेम्स पाहायला मिळतात. पांढऱ्या रंगाच्या भिंतींमुळे तिच्या घरात कायम पुरेसा प्रकाश पसरलेला दिसतो. तिच्या घराचे दरवाजे आणि घरातील फर्निचर हे तपकिरी रंगाचे असून पांढऱ्या भिंतींमुळे ते खूप उठून दिसतं. क्रांतीच्या फोटो आणि व्हिडिओ मधून तिच्या घराची सफर घडताना दिसते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar)

काय मग मंडळी, कसं वाटलं क्रांतीचं घर? आवडलं ना तुम्हाला? क्रांतीच्या या आलिशान घराविषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला जरूर कळवा. तसेच आमचे लेख तुम्हाला आवडतात का हेही आम्हाला नक्की कळवा. आमचे तुम्हाला आवडलेले लेख लाईक आणि शेअर करायला विसरू नका.