‘मी मेल्यानंतर…’ कुशल बद्रिकेच्या पोस्टनं वेधलं लक्ष! चाहत्यांच्या भावुक कमेंट्स…

सध्या चित्रपटगृहांमध्ये ‘पांडू’ चित्रपटाने धमाल उडवून दिलेली दिसत आहे. ३ डिसेंबरला हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी आपल्या उदंड प्रतिसादाने सिनेमागृहं भरून टाकली. पहिल्याच दिवशी चित्रपटानं दारात ‘हाऊसफुल’ चा बोर्ड लावला. या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली होतीच. मग यातील गाणी रिलीज झाली आणि बघता बघता प्रेक्षकांनी ती डोक्यावर घेतली.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kushal Badrike official (@badrikekushal)

या चित्रपटात प्रमुख भूमिकेत अभिनेते भाऊ कदम आणि कुशल बद्रिके तसेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आहे. भाऊ कदम आणि कुशल बद्रिके आपल्याला ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावरून नेहमीच हसवताना दिसतात. मात्र या चित्रपटामुळे त्यांच्या विनोदाची वेगळी बाजू पाहायला मिळाली. अभिनेता कुशल बद्रिके आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वरून या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे.

तसा तर कुशल बद्रिके सोशल मीडिया वर बराच सक्रीय आहे. त्याच्या फोटो आणि व्हिडिओजना प्रेक्षक भरभरून पसंती देताना पाहायला मिळतात. मात्र सध्या त्याच्या एका पोस्टने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्याने ‘पांडू’ चित्रपटातील ‘दादा परत या ना’ या गाण्याचा व्हिडिओ शेअर करत एक हृदयस्पर्शी पोस्ट लिहिलेली दिसत आहे. मात्र त्याच्या या पोस्टने त्याच्या चाहत्यांच्या मनाला हात घातला आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kushal Badrike official (@badrikekushal)

त्याने कॅप्शन मध्ये लिहिले आहे, “मी मेल्यानंतर मिडिया कडे एक तरी गाण असावं वाजवायला ज्यात मी आहे, असं मला कायम वाटायचं. असं एक जबरी गाण दिल्याबद्दल अवधूत गुप्ते सर सगळ्यात आधी तुम्हाला लै लै थँक यू.” त्याच्या या पोस्ट वर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. ‘असं का बोलतोस? तुला अजून खूप सिनेमे गाजवायचे आहेत दादा’, ‘जबरी… तुला शंभर वर्षं आयुष्य आहे आणि काळजी करू नको दादा’, ‘सर, तुम्ही एक काय, अजून भरपूर गाण्यांमध्ये दिसणार आहात. ऑल द बेस्ट!’, ‘सर तुम्ही कोणत्या गाण्यात जरी नाही दिसला तरी तुम्ही ऑल टाइम फेव्हरेट राहणार’, ‘ये तो शुरुवात है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’ अशा कमेंट्सनी कुशलचा कमेंट बॉक्स भरून वाहतो आहे.

काही चाहत्यांनी मात्र या कमेंट्स बरोबरच ‘आपल्याला गाणं आवडलं, पण कॅप्शन आवडली नाही’ अशी काळजीपोटी तक्रार केली आहे. या सगळ्या कमेंट्स मधून आणि चाहत्यांच्या प्रतिसादातून हेच दिसून येतंय, की चाहत्यांचं कुशलवर किती प्रेम आहे ते. कुशल बद्रिकेने नेहमीच आपल्या अभिनयाने आणि विनोदाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत.