लग्नाची बेडी या मालिकेतून हा अभिनेता करणार छोट्या पडद्यावर कमबॅक! जाणून घ्या कोण आहे..?

सध्या मालिका क्षेत्रात खूप साऱ्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. अशात स्टार प्रवाह या वाहिनीवर ३१ जानेवारीपासून दुपारी एक वाजता एक नवीन मालिका दाखल होत आहे. लग्नाची बेडी हे या मालिकेचे नाव आहे. या मालिकेत बद्दलचा प्रोमो स्टार प्रवाह च्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट वर आपल्याला पाहायला मिळेल.

या मालिकेमध्ये दोन वर्षानंतर संकेत पाठक हा अभिनेता पुनरागमन करणार आहे. स्टार प्रवाह वरील लवकरच दाखल होणारी नवीन मालिका लग्नाची वेडिंग या मालिकेत संकेत पाठक हा आयपीएस राघव रत्नपारखी यांची भूमिका साकारणार आहे. गुन्हेगारीचा नायनाट करणारा, जीवाची बाजी लावायला कमी न पडणारा आयपीएस ऑफिसर राघव रत्नपारखी.

अभिनेता संकेत पाठक याच्यासाठी ही नवीन मालिका एक मोठं आव्हान आहे. लग्नाची बेडी या मालिकेबद्दल सांगताना संकेत पाठक म्हणाला, राघव रत्नपारखी अतिशय साधा आणि धाडसी आयपीएस ऑफिसर आहे. एकत्रपणे कुटुंबात वाढल्यामुळे कुटुंबाचे महत्त्व त्याला खूप समजते. हे नवीन पात्र साकारण्यासाठी मी आता खूपच उत्सुक आहे.

नव्या वर्षाची सुरुवात चांगल्या कामापासून होत आहे याचा मला खूप आनंद आहे. खाकी वर्दीची ताकद ही सर्वांना माहीतच आहे. तो पोशाख परिधान केल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा आपल्यामध्ये संचारते. हे पात्र साकारताना अभिनेता म्हणून मला नवनवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत. याचबरोबर महाराष्ट्राची नंबर वन आणि गाजलेली मराठी वाहिनी स्टार प्रवाह यासोबत माझे जुने संबंध आहेत. या अगोदर दुहेरी आणि छत्रीवाली या मालिकेवर प्रेक्षकांनी खूपच प्रेम भरसवले होते.

त्यामुळे आता ही नवीन पात्र आणि नवीन मालिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची आशा मी बाळगतो. स्टार प्रवाह मालिका वाहिनीने आतापर्यंत खूप साऱ्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणल्या आहेत. तर आता ही नवीन मालिका प्रेक्षकांना आवडते का याची हुर त्यातील कलाकारांना लागली आहे. तर तुम्हाला या मालिकेचा प्रोमो बघून काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा याचबरोबर तुम्हाला आमचा लेख कसा वाटला हे नक्की सांगा धन्यवाद.