मुकेश अंबानींची मुलगी लग्नानंतर राहते महालासारख्या या घरात! घर पाहून थक्क व्हाल…

भारतातील अतिश्रीमंत व्यक्तींमधील एक व्यक्तिमत्व म्हणजे मुकेश अंबानी. त्यांच्या एकुलत्या एका मुलीचं लग्न झालं, तेव्हा त्या लग्नाची चर्चा कितीतरी दिवस होत होती. कारण मुकेश अंबानी यांनी आपल्या मुलीचे लग्नच तितक्या धूमधडाक्यात लावून दिले होते. आपली मुलगी इशा अंबानीचे लग्न मुकेश यांनी तेवढ्याच तोलामोलाच्या स्थळाबरोबर जमवले होते. इशाचा नवरा देखील तितकाच श्रीमंत आहे.

इशा लग्नाआधी आपल्या वडिलांच्या घरी म्हणजेच बहुचर्चित ‘अँटिलीया’ या इमारतीत रहात होती. २०१८ मध्ये तिचे आनंद पिरामल सोबत लग्न झाले. त्यानंतर ती अँटिलीया सोडून आपल्या नवऱ्याच्या बंगल्यात राहायला गेली. तिचा हा नवीन बंगला एखाद्या महालाला लाजवेल इतका भव्य आणि शानदार आहे. इशा आणि आनंद यांना लग्नानंतर हा बंगला भेट म्हणून मिळाला होता. पिरामल ग्रुपचे चेअरमन अजय पिरामल यांचा आनंद पिरामल हा मुलगा आहे. अजय पिरामल यांचे फार्मास्युटिकल, फायनान्शिअल सर्व्हिसेस, रिअल इस्टेट, इन्फर्मेशन सर्व्हिस, ग्लास पॅकेजिंग असे अनेक व्यवसाय आहेत.

आनंद बरोबर लग्न झाल्यावर इशा ‘गुलिता’ या बंगल्यात राहायला गेली. हा ‘गुलिता’ बंगला एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाही. २०१५ मध्ये या बंगल्याचे काम सुरू करण्यात आले होते. २०१२ मध्ये अजय पिरामल यांनी हिंदुस्तान युनिलिव्हर कडून ही संपत्ती ४५० करोड रुपयांना खरेदी केली होती. नूतनीकरणानंतर या जागेची किंमत अजून वाढली आहे. गुलिता बंगला जवळपास ५० हजार स्क्वेअर फुटांवर वसला आहे.

इशाचा बंगला समुद्रकिनारी असून घरातून समुद्राचे खूप सुंदर दृश्य दिसते. हे घर डायमंड थीममध्ये बनवण्यात आले आहे. या घरातील प्रत्येक वस्तू खास परदेशातून मागवण्यात आली आहे. या घराच्या किचन मधील प्रत्येक सामान हे उंची किंमतीचे आहे. पाहुण्यांसह घरातील सगळ्यांनाच चांदीच्या भांड्यांमध्ये जेवण वाढले जाते. घरात ठिकठिकाणी उंची झुंबरे लावण्यात आली आहेत. घराचे इंटेरियर हे अतिशय सुरेख असून सर्व घरात इम्पोर्टेड वस्तू पाहायला मिळतात.

image: timesnow

असे म्हणतात, की ही जमीन जेव्हा हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडच्या ताब्यात होती तेव्हा या जागेवर त्यांचे प्रशिक्षण केंद्र होते. अजय पिरामल यांनी ही संपत्ती विकत घेतल्यावर त्यात बरेच बदल करण्यात आले. इंटेरियरसह एक्सटेरियर देखील बदलण्यात आले आहे. घरातील बऱ्याच ठिकाणी डायमंड वापरण्यात आले आहेत. एकूणच इशा अंबानीचा हा बंगला अत्यंत देखणा आहे.