नेहमी अनवाणी पायाने लता मंगेशकर गात होत्या गाणी, तब्बल ३०००० हजार पेक्षा जास्त गायली आहेत गाणी…

मित्रहो संगीत क्षेत्रातील सम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन झाले…… ही खबर अनेकांना थक्क करत आहे. आपल्या आवाजाने सर्वत्र जादु पसरवणाऱ्या लता मंगेशकर यांना मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता प्राप्त झाली आहे. आपल्या उभ्या आयुष्यात त्यांनी अनेक अडचणींचा सामना करत यशाच्या शिखरावर त्यांनी उड्डाण घेतली आहे. आज मात्र ही उड्डाण रसिकांना पोरकी करून गेली आहे. त्यांच्या अशा जाण्याने अनेकजण भावुक होऊन सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करत आहेत. अनेक लोक त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

या गान कोकिळेने २८ सप्टेंबर १९२९ रोजी इंदोर मध्ये जन्म घेतला होता, त्यांच्या आई वडिलांची त्या पहिलीच कन्या होत्या. नंतर मीना, आशा भोसले, उषा, हृदयनाथ मंगेशकर या भावंडांनी जन्म घेतला. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी लता मंगेशकर गायनासाठी उभ्या राहिल्या होत्या, वडिलांकडून मिळालेला गायनाचा वारसा त्यांनी आयुष्यभर जपून ठेवला होता. इतक्या लहान वयात त्यांनी गाणी गायली आहेत, सुरुवातीला त्यांचा आवाज खूप नाजूक होता त्यामुळे त्यांना कोणी काम देत न्हवते. पण तरीही त्यांनी माघार न घेता या कलाक्षेत्रात आपला संघर्ष सुरू ठेवला.

एकेकाळी नाजूक आवाजामुळे दुर्लक्ष केला गेलेला आवाज आज भारताची शान ठरला आहे. संगीत क्षेत्रातील कोहिनुर हिरा असलेल्या लता यांनी आपल्या भावंडांचा सांभाळ करण्यासाठी आपले सर्व आयुष्य त्यांना दिले, त्यांनी कधीच लग्न सुद्धा केले नाही. आपलं संपूर्ण आयुष्य गाण्याला आणि भावंडाना दिले, त्यांनी आपले शिक्षण केले नाही. जेव्हा त्या शाळेत गेल्या तेव्हा पहिल्या दिवसापासून त्यांनी शाळेतील मुलांना गाणी शिकवायला सुरुवात केली होती. पण शिक्षकांना हे पसंत न्हवते म्हणून त्यांनी लता याना असे करण्यास नकार दिला.

त्यामुळे लता यांनी शाळा सोडून दिली. मात्र तरीही आज त्यांनी प्रत्येक भारतीयाच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. अनेक भारतीय भाषांतून त्यांनी जवळपास ३० हजार पेक्षा अधिक गाणी गायली आहेत. त्या दरवेळी गाणी गाताना अनवाणी राहून गात असायच्या, यातूनच आपल्याला त्यांची गायना प्रति असलेली भक्ती जाणवते. भारताचा हिरा आता भारताने गमावला आहे, त्यामुळे प्रत्येकाची नजर नम्र झाली आहे.

आपल्या गोड आवाजात त्यांनी देशभक्तीवर सुद्धा अशी गाणी गायली आहेत ज्यातून अंगावर शहारे येतात. रसिकांच्या हृदयात त्यांनी आपल्या आवाजातून देशभक्ती जागी केली आहे. आपल्या गायनातून त्यांनी इतिहास गाजवला आहे. कोणाला माहीत होत त्यावेळी की ही १३ वर्षाची मुलगी अवघ्या भारताला वेड लावेल, खरच आज त्यांच्या जाण्याने भारत पोरका झाला आहे. पण जरी लता आपल्या मध्ये नसल्या तरीही त्यांचा आवाज नेहमीच रसिकांना हाक देत राहील.