फक्त ‘या’ कारणांमुळे लता मंगेशकर यांनी केले नाही लग्न! कारण आहे खूप प्रेरणादायी…

मित्रहो आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या लता मंगेशकर यांनी आता जगाचा निरोप घेतला आहे, त्यांच्या अशा अचानक जाण्याने अनेकजण थक्क झाले आहेत. वयाच्या ९२ वर्षी त्यांची प्राणज्योत मावळली आहे, गेल्या एक महिन्यापासून त्या आजारी होत्या, त्यातच त्यांना कोरोना आणि निमोनिया यांच्याशी संघर्ष करावा लागला. त्यामुळे यादरम्यानच त्यांनी आपल्या जीवाला मोकळे केले. मात्र त्यांच्या जाण्याने पुन्हा एकदा कलाक्षेत्र पोरके झाले आहे.

वयाच्या १३ वर्षांपासून सगळी जबाबदारी स्वीकारली होती त्यांनी, त्यांच्या लहानपणीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते त्यामुळे सुरक्षेततेचा हातच डोक्यावर न्हवता. त्यांचं आयुष्य निराधार बनले होते मात्र अजून त्यांचे लहान भाऊ बहीण होते. त्यांना मोठे करून, त्यांचं भविष्य घडवायचे होते. ही सर्व जबाबदारी लता मंगेशकर यांनी निस्वार्थी पणे स्वीकारली आणि अचूकपणे ती पार पाडली आहे. आपल्या भावंडाना त्यांनी खूप छान जपले आहे, त्यांना शिकवले, मोठे केले आहे.

मात्र भावंडांचे भविष्य घडवण्यात त्यांनी आपले भविष्य, आपली सुख पायाखाली तुडवली. स्वतःची समजूत घालून त्यांनी आपले आयुष्य गायकीला आणि आपल्या परिवाराला दिले. त्यामुळे त्यांनी कधी लग्नाचा विचार देखील केला नाही, या जबाबदारींसाठी त्या आयुष्यभर अविवाहित राहिल्या. वडील नसल्याने मोठी बहीण या नात्याने त्यांनी कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली, आणि ती पार पाडण्यातच आयुष्य घालवले त्यामुळे त्यांनी कधीच लग्न केले नाही आहे हेच कारण आहे त्यांच्या अविवाहित राहण्याचे.

लता मंगेशकर यांनी आपल्या आवाजाची जादू गेली कित्येक वर्षे रसिकांच्या मनावर केली आहे. अनेक भाषा मधून त्यांनी हृदयाची तार छेडली आहे. त्यांच्या प्रत्येक गाण्यात आवाजातून त्यांनी ते उत्कृष्ट रित्या अभिनित केले आहे. त्या गाण्यातील सूर, स्थळ, परिस्थिती, अभिनय, कलाकार, रुसवा, प्रेम, मैत्री, भक्ती या सर्व गोष्टी त्यांनी आत्मसात करुन गाणी गायली आहेत.त्यामुळे त्यांची गाणी ऐकताना आपोआप चेहऱ्यावर भाव उमटतात.

लता मंगेशकर यांनी आपल्या गायनातून मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवली आहे. वयाच्या १३ वर्षांपासून त्या कलाक्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांच्या प्रत्येक गाण्याला रसिकांनी नेहमीच चांगला प्रतिसाद दिला आहे. मित्रहो जरी लता मंगेशकर या जगात नसल्या तरीही त्यांच्या प्रत्येक गाण्यातून त्या नेहमीच आपल्या हृदयात राहतील. रसिकांच्या हृदयात असणाऱ्या त्यांच्या आठवणी नेहमी ताज्या होत राहो ही सदिच्छा.