गीतकारच्या चुकीच्या वागणुकीवर रागावून धमकावले होते लता मंगेशकर यांनी..म्हणाल्या “विसरू नको मी मराठा आहे”

मित्रहो प्रत्येक वयाला शोभेल असा आवाज घेऊन जन्माला आलेल्या गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांनी इतिहास रचून जगाचा निरोप घेतला आहे. वयाच्या १३ व्या वर्षांपासून आपल्या गायनाची सुरुवात त्यांनी केली होती, तब्बल पाच पिढ्यानी त्यांचा आवाज ऐकला आहे. संगीत क्षेत्रातील हिरा हरवला असल्याची बातमी जेव्हा समजली तेव्हा जवळपास संपूर्ण भारताचा श्वास क्षणभरासाठी थांबला होता. अनेकजण ही बातमी ऐकून थक्क झाले होते, सोशल मीडियावर भरपूर लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आज प्रत्येक भारतीय भावुक झाला आहे, आपल्याला मिळालेला हिरा आता पुन्हा पाहायला मिळणार नाही हे जाणून अनेकजण डोळ्यात पाणी भरत आहेत. लता मंगेशकर यांनी आपल्या आयुष्यात खूप मोठा संघर्ष केला आहे, वाडीलांच्या निधनाने परिवाराची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली होती. आपल्या भावंडाना सांभाळण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली त्यामुळे त्यांनी कधी लग्न देखील केले नाही.

ज्या गाण्याला त्यांचा आवाज मिळाला ते गाणे अमर झाले आहे. त्यांच्या आयुष्यात अनेक किस्से होऊन गेले आहेत, त्यातीलच एक खास किस्सा म्हणजे फिल्म “महल” जेव्हा चालू होती तेव्हा त्या बैठकीत गीतकार नक्शाब यांनी लता यांच्या चमकत्या लेखणीचे खूप कौतुक केले. तेव्हा लता त्यांना म्हणाल्या की “हे घ्या तुम्ही ठेवून घ्या”. असे म्हणत त्यांनी आपली लेखणी गीतकारला देऊन टाकली. पण त्या विसरल्या की त्या लेखणीवर त्यांचे नाव होते, गितकाराने “लता” नावाची लेखणी इंडस्ट्री मध्ये सर्वाना दाखवायला सुरुवात केली.

त्यातून नक्शाब यांना दाखवायचे होते की त्यांच्या दोघात काहीतरी सुरू आहे, मात्र लता या बाबतीत शांत राहिल्या. कारण त्यांनी विचार केला की जर आपण हे खोटं आहे असे सांगण्याचा प्रयत्न केला तर प्रकरण आणखी वाढेल आणि लोकांना मजा घेत बसायला कारण मिळेल. पुढे आणखी एका रेकॉर्डिंग वेळी लता यांची त्या गितकाराशी भेट झाली, तेव्हा ते गीतकार अगदीच डेस्पिरेट झाले होते की लता त्यांच्या प्रेमात पडतील. त्यामुळे जेव्हा रेकॉर्डिंग सुरू झाली तेव्हा मध्ये मध्ये लता यांच्या बूथ मध्ये ते जात होते. लता याना म्हणत होते की “या लाईन मध्ये प्रेम भर, एवढे प्रेम भर की असे वाटेल जणू तू तुझ्या प्रियकरसमोर विना शर्त समर्पित करत आहेस”.

यावेळी देखील लता यांनी आपला अनावर झालेला राग आवरला, पण मात्र पुढे त्या गितकाराने आपली हद्द पार केली. ते अचानक लता यांच्या घरी पोहचले, त्यावेळी लता मंगेशकर आपल्या भावंडांसोबत खेळत होत्या. या बाबत बोलताना लता म्हणाल्या होत्या की “तेव्हा मी एकटी असते तर मला अडचण निर्माण झाली असती, पण माझ्या बहिणींसमोर त्या चिपकु माणसाचा एकही शब्द ऐकायचा न्हवता. मी त्यांना रस्त्यावर घेऊन गेले, साडीचा पदर मी कमरेला खोवला आणि विचारलं की माझ्या परवानगी शिवाय घरी येण्याची हिंमत कशी झाली. पुन्हा इथे दिसला तर तुकडे करून गटारीत फेकून देईन. विसरू नका मी मराठा आहे”.

लता मंगेशकर यांनी आपल्या पध्दतीने त्या गितकाराला चांगलेच धमकावले. त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से खुप काही शिकवतात. या अशा गान सम्राज्ञीला गमावून आज प्रत्येक जण दुःखी आहे. पण रसिक हो लता मंगेशकर जरी आपल्या मध्ये नसल्या तरीही त्यांच्या आवाजातून त्या नेहमीच आपल्या हृदयावर अधिराज्य गाजवतील.