मृत्यू आधीचा लता ताईचा व्हिडिओ व्हायरल, पहा व्हिडिओ.

मित्रहो आपल्या आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका लता मंगेशकर यांनी ७ फेब्रुवारी रोजी जगाचा निरोप घेतला होता, अगदी शासकीय इतमामात त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला होता. त्यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच सिनेसृष्टीत कार्यरत असणारे दिग्गज कलाकार सुद्धा तिथे उपस्थित होते. काल संध्याकाळी शिवाजी पार्क इथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. हा क्षण अनेकांना अश्रू अनावर करणारा होता.

भारताची स्वर कोकिळा म्हणून जगभर प्रसिद्ध असणाऱ्या लता मंगेशकर यांनी वयाच्या ९२ वर्षी जीवाला मोकळे केले. त्यांनी आपल्या आयुष्यातील ७८ वर्षे या इंडस्ट्रीला दिली होती, आणि या इतक्या वर्षात जवळपास ३६ भारतीय भाषांतून त्यांनी ३०००० पेक्षा अधिक गाणी गायली आहेत. वयाच्या १३ वर्षांपासून त्यांनी आपल्या आयुष्यात संघर्ष केला आहे, आपल्या परिवाराला सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर असल्याने त्यांनी कधी लग्नाचा विचार सुद्धा केला नाही.

लता मंगेशकर यांचे अंतिम क्षण खुप मोलाचे होते, असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या नजरेत येत आहे. ज्यामध्ये लता दीदी कोव्हीडशी झुंज देताना दिसत आहेत. त्यांना मुंबई मधील ब्रीच कँड्री या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या व्हायरल व्हिडीओ मध्ये आपण पाहू शकतो की लता दीदी कोणाचा तरी आधार घेऊन चालताना दिसत आहेत. जेव्हा रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले होते तेव्हा हा व्हिडीओ बनवला होता.

आजारपणामुळे लता दिदींच्या शरीरात खूप थकवा आहे, या व्हिडीओ मध्ये स्पष्टपणे दिसते की लता दीदी आधाराशिवाय अजिबात चालू शकत नाहीत. दोन महिलांनी त्यांना पकडले असून त्या हळूहळू चालत आहेत. त्यांची ही परिस्थिती पाहताना सहज अश्रू ठिबकतात. लता मंगेशकर यांनी आपल्या आवाजातून आपले मातृत्व नेहमीच झळकवले आहे. त्यामुळे अनेकजण त्यांच्याशी मनाने जोडले गेले आहेत.

त्यांच्या आवाजातून आपणाला देशभक्ती जाणवते, देशावर प्रेम करायला त्यांनी शिकवले आहे. त्यांच्या आवाजाची जादू रसिकांना मंत्रमुग्ध करून सोडते. आजवर त्यांनी अनेक गाणी गायली आहेत, जी आजही ओठावर सहज येतात. गायनाला आयुष्य अर्पण करणाऱ्या लता मंगेशकर यांनी जरी आपला निरोप घेतला असला तरीही त्यांच्या गण्यातून त्या सदैव आपल्या सोबत राहतील…!!