माधुरीला गोविंदाने घातलेली लग्नासाठी मागणी, तुफान चर्चेत आले होते मंडळ! त्यानंतर माधुरीने दिले असे उत्तर…

मित्रहो बॉलिवूड सुपरस्टार सोबत नेहमीच काही ना काही घडत असते. जे चाहत्यांच्या घोळक्यात खूप चर्चेत येत असते.हल्ली सोशल मीडियावर एक व्हायरल व्हिडीओ भलताच चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ अभिनेता गोविंदा आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचा असून सर्व नेटकरी हा व्हिडीओ पाहून चकित झाले आहेत. डान्स दिवानेच्या सेटवर गोविंदाने गेस्ट जज म्हणून हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्याने माधुरी बद्दलचा एक किस्सा सांगितला होता. हा किस्सा ऐकून सर्वत्र हास्याचा कल्लोळ उठला होता.

गोविंदा म्हणतो ” माधुरीचा माझ्यासारखा दुसरा कोणीच चाहता असू शकत नाही. कदाचित तुम्ही लोक फक्त चर्चाच करत असाल, पण मी आणि अमिताभ बच्चनजी आम्ही दोघांनी माधुरीला विचारलं….की तू लग्न करणार का? त्यावेळी माधुरीने आमच्या दोघांकडे दुर्लक्ष केले होते. इतकेच नाही तर तीने आम्हाला नाही नाही म्हणत थेट नेनेंसोबत लग्न केले”. हे ऐकून त्यावेळी माधुरीच्या चेहऱ्यावर निराळीच रिएक्शन होती. ती त्यावेळी खूप शांत झाली होती.

पण खरेतर गोविंदाने माधुरीला लग्नाची मागणी घातली न्हवतीच, फक्त केवळ एक मस्करी म्हणून त्याने हा विनोद केला. मात्र माधुरी त्याच्या या मस्करीवर अजिबात चिडली नाही, उलट ती या मस्करीला एन्जॉय करताना दिसली. ती अगदी खळखळून हसताना दिसली, तसेच तिच्या बरोबर तिथे असणारे सर्व जण पोटभर हसले होते. हा व्हिडिओ पाहून अनेक नेटकरी, चाहते खूप हसत आहेत. सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.

माधुरी आणि गोविंदा हे दोघेही ९० च्या काळातील उत्कृष्ट कलाकार आहेत. त्यांचे अनेक चित्रपट चाहते आजही मनापासून पाहतात. त्यांचे अभिनय अगदी क्षणात मन जिंकतात, त्यामुळे त्यांचे कोणीही क्षणात चाहता होतो. माधुरी तर बॉलिवूड मधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री असून, तिच्या सौंदर्याच्या चर्चा आताही सुरू असतात. बॉलिवूड मध्ये अनेक नवीन अभिनेत्री सुरुवात करत आहेत, मात्र माधुरी आजही स्वप्नसुंदरी आहे.

तसेच अभिनेता गोविंदा देखील अनेक चित्रपटात झळकला आहे. त्याचे खूपसे चित्रपट गाजलेले असून, लोकप्रिय बनले आहेत. त्याने आपल्या अभिनय कौशल्यातून भरपूर प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवली आहे. या दोन्हीही उत्कृष्ट कलाकारांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.