मलायका अरोरा आणि अरबाज खान दिसले एअरपोर्टवर एकत्र! पाहून लोक म्हणले इथे कशाला भांडताय..

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अरबाज खान यांच्या बरीच वर्षं सुखाने सुरू असलेल्या संसाराला कुणाची तरी नजर लागली आणि ते वेगळे झाले. मलायका आता अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत असून अरबाज खान देखील एका मॉडेलला डेट करत असल्याची बातमी येत आहे. आता या दोघांच्या वाटा इतक्या वेगळ्या झालेल्या असताना पुन्हा जेव्हा दोघांना एकत्र बघण्यात आलं तेव्हा सगळ्यांचेच डोळे विस्फारले.

हो, अलीकडेच मलायका आणि अरबाजला एकत्र पाहण्यात आले. त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. मात्र मलायका आणि अरबाज नवरा-बायको म्हणून जरी वेगळे झाले असले तरी ते आईवडील म्हणून मात्र वेगळे झालेले नाहीत. आपल्या मुलासाठी ते नेहमी एकत्र येताना दिसतात. आताही ते आपल्या मुलासाठी एअरपोर्टवर एकत्र दिसले. आपला मुलगा अरहानला सोडण्यासाठी दोघे एअरपोर्टवर एकत्र दिसून आले.

मलायका आणि अरबाज जरी एकमेकांपासून वेगळे झाले असले आणि आपल्या आपल्या आयुष्यात कितीही व्यस्त झाले असले तरी ते नेहमी आपल्या मुलासाठी वेळ काढतात आणि त्यासाठी एकत्र वेळ देखील घालवतात. सध्या याचाच एक व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसत आहे. मलायका आणि अरबाज दोघेही एअरपोर्टवर त्यांचा मुलगा अरहान सोबत एकत्र दिसून आले.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

विरल भयानीच्या सोशल मीडिया पेज वर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओ मध्ये सगळ्यांनी मास्क घातलेला दिसून येत आहे. अरबाज आणि मलायका एकमेकांशी बोलत देखील आहेत. तर अरहान आपल्या मित्रांची गळाभेट घेताना दिसत आहे. या पोस्टवर लाखो लाईक्स आले असून त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

एका नेटकऱ्याने ‘तुम्ही दोघे का भांडत आहात?’ असा प्रश्न कमेंट मध्ये विचारला आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने ‘मलायका अर्जुनपेक्षा अरबाज सोबत चांगली दिसते’ असे म्हणत आपले मत व्यक्त केले आहे. ‘घटस्फोटानंतरही आईवडील मुलांसाठी अनमोल भेटवस्तू असतात जे दोघांमधील नातं टिकवून ठेवतात’ अशी प्रतिक्रिया देखील एका नेटकऱ्याने दिली आहे.

तुमच्या आवडत्या कलाकारांबद्दल असेच अपडेट्स आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो. हे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या सोशल मीडिया पेजेसना फॉलो करा. तसेच तुम्हाला आमचे जे लेख आवडतात, ते लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करायला विसरू नका.