अरेरे! मलायका अरोरा थोडक्यात वाचली ‘या’ ड्रेस दुर्घटनेपासून! शिताफीने हाताळला ड्रेस…

बॉलिवूड डिवा मलायका अरोरा तिच्या फिटनेससाठी खूप प्रसिद्ध आहे. वयाच्या ४८ व्या वर्षीही ती आपली फिगर व्यवस्थित मेंटेन करून आहे. नियमित योगा, जिम यांमुळे ती आपला फिटनेस या वयातही राखून आहे. आपल्या फिटनेस बरोबरच ती तिच्या फॅशन सेन्ससाठीही खूप प्रसिद्ध आहे. मॉडेल असल्याने मलायका नेहमीच एकापेक्षा एक आऊटफिट्स मध्ये दिसून आली आहे. जिम पासून रेड कार्पेट पर्यंत, तिचे आऊटफिट्स नेहमीच चर्चेत असतात. मात्र आपल्या या आऊटफिट्स वरून ती बऱ्याचदा ट्रोल देखील होत असते.

आतादेखील ती आपल्या एका आऊटफिट वरून ट्रोल होताना दिसत आहे. मिस डिवा युनिव्हर्स ग्रँड फिनाले मध्ये मलायका अतिशय स्टायलिश लूक मध्ये पाहायला मिळाली. तिच्या गोल्डन यलो कलरच्या फ्लोरल स्टाईल ड्रेसमध्ये ती खूपच सेक्सी दिसत होती. या ड्रेसला मॅच होईल अशी हिऱ्याची अंगठी आणि हिऱ्याचे कानातले तिने घातले होते. तसेच तिच्या गोल्डन यलो ड्रेसला मॅच होतील असे गोल्डन हिल्स देखील तिने घातले होते. मंचावर येताच तिने मीडिया कॅमेऱ्यांसमोर पोज द्यायला सुरुवात केली. मात्र थोड्या वेळातच तिच्यावर ‘वॉर्डरोब मालफंक्शन’ ला सामोरे जाण्याची नामुष्की ओढावली.

मंचावर येऊन मलायका मीडिया समोर पोज देऊ लागली. मात्र थोड्या वेळातच तिचा वन शोल्डर ड्रेस खांद्यावरून घसरून तिच्या हातावर यायला लागला. मलायकाने शिताफीने आपला ड्रेस वेळीच सांभाळला. मात्र त्याचे फोटो सोशल मीडिया वर व्हायरल झालेच. हे काही पहिल्यांदा झालेले नाही. याआधीही मलायका ‘वॉर्डरोब मालफंक्शन’ मुळे ट्रोल होताना दिसली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Click N likes (@clicknlikes)

या आधी तिने एकदा फॅशन डिझायनर जोडी फाल्गुनीच्या ‘काला घोडा स्टोअर’ लाँचला हजेरी लावली होती. त्यावेळी तिने अतिशय सुंदर असा निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. मात्र कॅमेऱ्यासमोर येताच तिचा डीप नेक टॉप खराब झाला. तिने तो तिथेच ठीक करायला सुरुवात केली. मात्र हे क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आणि नंतर सोशल मीडिया वर व्हायरल झाले.

मलायका तिच्या जिम आऊटफिट मुळे देखील अनेकदा ट्रोल होताना दिसते. अलीकडेच ती अत्यंत छोट्या कपड्यांमध्ये रस्त्यावर दिसली होती. यावेळी तिला ट्रोल करत नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या होत्या. एका नेटकाऱ्याने ‘तिने हे का घातले?’ असा प्रश्न विचारला होता, तर दुसऱ्या एका नेटकाऱ्याने तिच्या कपड्यांची टर उडवत ‘इतकी गरिबी आली आहे का?’ असा टोमणा मारला होता. कोणी तिला तिच्या छोट्या कपड्यांचे कारण विचारले, तर कोणी अत्यंत साळसूदपणे ‘या सेलिब्रेटींना थंडी वाजत नाही का?’ असा गमतीदार प्रश्न विचारला.