‘मालगुडी डेज’ मधील ‘स्वामी’ आठवतो का? आता दिसतो असा…ओळखणंही झालं कठीण

आपल्याकडे ‘जुनं ते सोनं’ नावाची एक खूप सुंदर म्हण आहे. जुन्या गोष्टींची आपली अशी एक खासियत असते जी नेहमीच लोकांच्या बराच काळ स्मरणात राहते. काही जुन्या मालिकांच्या बाबतीतही काहीसे असेच म्हणता येईल. आपल्याकडे ‘दूरदर्शन’ वाहिनी वर जुन्या काळी अशा अनेक मालिका होऊन गेल्या ज्या लोकांच्या आजही चांगल्या लक्षात आहेत. १९८६ मधील ‘मालगुडी डेज’ ही त्यातीलच एक मालिका.

या मालिकेनं लोकांना हसवलं, शिकवण दिली, त्यांच्या आयुष्यात स्वतःचं एक विशेष स्थान बनवलं. या मालिकेतील कथा, त्यातली पात्रं आजही लोकांना लक्षात आहेत. असंच एक पात्र होतं ‘स्वामी’. या लहान मुलाने प्रेक्षकांना त्यांच्या बालपणात नेऊन सोडलं. धोतर, झब्बा, टोपी, हातात पाटी, पिशवी, शाळेचं दप्तर अशा अवतारातला हा स्वामी म्हणजे एक अविस्मरणीय पात्र. विशेष म्हणजे स्वामीच्या भागांना नेहमीच जास्त टीआरपी मिळालेला आहे. त्यामुळे हे पात्र मालिकेतील सर्वांत लाडकं आणि लोकप्रिय पात्र होतं असं म्हणायला हरकत नाही. लोक आजही मालिकेच्या इतर भागांच्या तुलनेत स्वामी आणि त्याच्या मित्रांचे भाग जास्त वेळा बघतात.

तर असं हे लोकप्रिय ‘स्वामी’चं पात्र साकारलं होतं बालकलाकार मास्टर मंजूनाथने. काही वर्षांपासून मास्टर मंजूनाथ बद्दल लोकांना फारशी माहिती नव्हती. आता मात्र मंजूनाथचा एक फोटो समोर आला आहे ज्यात त्याला ओळखणेही कठीण झाले आहे. बालकलाकार म्हणून मास्टर मंजूनाथने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले. त्याने हिंदीसह कन्नड भाषेतही काम केले आहे. मात्र १९ व्या वर्षी तो शिक्षणाच्या निमित्ताने मनोरंजनसृष्टीपासून लांब गेला तो कायमचा.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Manjunath Nayaker (@mastermanjunath)

मास्टर मंजूनाथने उत्सव (१९८४), अग्निपथ (१९९०), द स्टोन बॉय (१९९१), बेनाम बादशाह (१९९१), विश्वात्मा (१९९२) यांसारख्या हिंदी चित्रपटांसह एका तेलगू आणि अनेक कन्नड चित्रपटांमध्ये भूमिका निभावल्या आहेत. ‘मालगुडी डेज’ मधील स्वामीच्या भूमिकेने त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. त्याने ही भूमिका साकारायला सुरुवात केली तेव्हा तो अवघ्या तीन वर्षांचा होता. १९९२ मध्ये त्याने एक तेलगू चित्रपट केला. त्यानंतर मात्र तो सिनेसृष्टीपासून लांब झाला.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Manjunath Nayaker (@mastermanjunath)

आता तो आपल्या कुटुंबासह बंगळुरू मध्ये रहात असल्याचे कळते. तिथे तो एका आयटी कंपनीत पीआर कन्सल्टन्ट म्हणून नोकरी करत आहे. लहानपणीचा मास्टर मंजूनाथ आणि आता मोठा झालेला मंजूनाथ यांच्यात खूपच फरक पडला आहे. त्याच्यातील बदल पाहून लोक अवाक झाले आहेत.