‘मलायका शिवाय जगणं कठीण होतं…’ अरबाजचा घट’स्फो’टानंतर खु’ला’सा!

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अरबाज खान हे बॉलिवूड मधील सर्वांत हॉ’ट कपल म्हणून ओळखले जायचे. दोघांमधील बॉन्डिंग नेहमी उठून दिसायचे. कोणत्याही इव्हेंटला दोघे एकत्र जात असत. त्यामुळे या दोघांच्या घट’स्फो’टाच्या बातमीने सामान्य जनतेसह बॉलिवूडलाही ध’क्का बसला होता. १९९३ मध्ये एका कॉफीच्या जाहिरातीच्या दरम्यान दोघांची ओळख झाली होती.

ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि पुढे प्रेमात झाले होते. जवळपास ५ वर्षं दोघे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी आपल्या नात्याला नवीन रूप देण्याचे ठरवले. १९९८ मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. हे लग्न मुस्लिम आणि ख्रिश्चन दोन्ही पद्धतींनी करण्यात आले होते.

२००२ मध्ये मलायकाने त्यांचा मुलगा अरहानला जन्म दिला. मलायकाचे आपल्या मुलावर खूप प्रेम आहे. मलायका आणि अरबाज मध्ये नंतर तक्रारी वाढू लागल्या. २०१६ मध्ये त्या दोघांनी आपण वेगळे होत असल्याचा निर्णय जाहीर केला. मे २०१७ मध्ये त्या दोघांनी घट’स्फो’ट घेतला. यामध्ये मलायकाकडे तिच्या मुलाचा ताबा आला. अरबाजला आपल्या मुलाला भेटायची परवानगी देण्यात आली.

एका मुलाखतीत बोलताना अरबाजने सांगितले, “माझ्यासाठी ही खूप अवघड गोष्ट होती, कारण मला एकट्याला रहावे लागणार होते. घट’स्फो’टानंतर मलायका शिवाय राहणे अवघड झाले होते. मात्र प्रत्येकाला आपला भूतकाळ विसरून आपल्या आयुष्यात पुढे जाण्याचा अधिकार आहे. त्यामुळे जे चालू आहे ते चांगलं चालू आहे असंच म्हणावं लागेल.”

जे झालं त्यात त्यांच्या मुलाचा एकही दो’ष नसल्याने दोघेही पालकत्व निभावत आपल्या मुलासाठी एकत्र येतात. दोघे वेगळे झाले असले तरी दोघांचे कुटुंबीय एकमेकांच्या खूप जवळ आहेत. आजही अरबाजला मलायकाच्या घरी तेवढ्याच आपुलकीने वागवले जाते असे अरबाज सांगतो.

अरहानचा ताबा मलायकाकडे राहू देण्याबाबत अरबाज सांगतो, की ‘एक आईच आपल्या मुलाचे पालनपोषण चांगल्या प्रकारे करू शकते. आमच्या मुलाने आमच्या नात्यातला तणाव बघितला आहे. घरात सुरू असलेल्या गोष्टी कळण्याइतपत तो मोठा होता. त्यामुळे त्याने कधी आमच्या वेगळं होण्याला वि’रोध केला नाही.’

सध्या मलायका तिच्यापेक्षा १२ वर्षांनी लहान असणाऱ्या अभिनेता अर्जुन कपूरला डे’ट करत आहे. तर अरबाज खान त्याच्यापेक्षा बऱ्याच वर्षांनी लहान असणाऱ्या मॉडेल जॉर्जिया अँड्रियानीला डे’ट करत असल्याचे बोलले जाते. एकूणच काय, तर दोघेही भूतकाळ विसरून आपल्या आपल्या आयुष्यात पुढील वाटचाल करत आहेत.