‘मन उडु उडु झालं’ मालिकेतील अभिनेत्याचा अप’घा’त! अ’प’घा’तातून थोडक्यात बचावला…पहा विडिओ

झी मराठी वाहिनी वरील नवी मालिका ‘मन उडु उडु झालं’ सध्या प्रेक्षकांच्या पसंतीची मालिका बनलेली पाहायला मिळत आहे. यातील इंद्रा आणि दीपूच्या व्यक्तिरेखा लोकांना फार भावल्या आहेत. इंद्राची भूमिका साकारणारा अभिनेता अजिंक्य राऊत याच्या संदर्भातली एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दिवाळीला घरी जात असताना त्याच्या कारला भी’षण अ’प’घा’त झाला. या अप’घा’तातून तो थोडक्यात बचावला आहे.

अजिंक्य दर दिवाळीला एक दिवस तरी परभणीला आपल्या घरी जातो. यावेळीही तो आपल्या मित्रांबरोबर ठाण्याहून कारमधून काही गिफ्ट्स घेऊन चालला होता. मात्र वाटेत गाडी स्लिट झाली. अजिंक्यचा मित्र गाडी चालवत होता. गाडी विजेच्या खांबावर आदळणार हे पाहून त्याने गाडी बाजूला घेतली. रस्त्यावरून उतरून गाडी थेट उतारावरून खाली गेली आणि काही अंतरावर एका झुडुपात जाऊन अडकली. एक मोठा अ’प’घा’त होता होता टळला.

सुदैवाने कोणालाही कोणतीही मोठी दुखापत झाली नाही. अजिंक्यने ही घटना सांगणारा व्हिडिओ सोशल मीडिया वर शेअर केला. या व्हिडिओ मध्ये त्याने सांगितले, की ‘सुदैवाने तेथे दरी असणारा रोड नव्हता. सुदैवाने आम्ही बचावलो. आमची गाडी थेट ११०० व्होल्टसच्या खांबावर जाऊन आदळणार होती. त्यामुळे मित्राने गाडी बाजूला घेतली. ती थेट खाली झुडुपात जाऊन अडकली. या झुडुपामुळे आम्ही बचावलो.’

व्हिडिओ मध्ये अजिंक्य पुढे म्हणतो, ‘देवाच्या कृपेने आम्ही वाचलो आणि आम्हाला ही दिवाळी बघता आली. या प्रसंगातून एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे कोणताही अवॉर्ड, कोणतीही प्रसिद्धी तुम्हाला जीवघेण्या प्रसंगातून वाचवू शकत नाही. या प्रसंगातून देवाने मला वाचवलं याचा मला आनंद आहे. आता उरलेल्या आयुष्यात मला काहीतरी चांगलं करता येईल अशी माझी अपेक्षा आहे. त्यामळे तुम्ही सगळ्यांनी आपली काळजी घ्या. लक्षात ठेवा, की हे सगळं क्षणार्धात नष्ट होणारं आहे. त्यामुळे एखाद्या चमत्काराची वाट न पाहता आपली स्वप्नं पूर्ण करत राहा.’

गाडी झुडुपातून बाहेर काढण्यासाठी त्यांना ट्रॅक्टर बोलवावा लागला. कार मागून आणि पुढून थोडी चेपली आहे. ट्रॅक्टरला दोरी बांधून गाडी बाहेर काढावी लागल्याचा व्हिडिओ देखील अजिंक्यने शेअर केला. अजिंक्यच्या चाहत्यांना मात्र या बातमीने प्रचंड ध’क्का बसला आहे. त्याच्या या व्हिडिओ वर अनेक कमेंट्स करत चाहत्यांनी अजिंक्यला काळजी घेण्यास सांगितले आहे.